Indogulf Cropsciences IPO GMP: पहिल्याच दिवशी १२ वाजेपर्यंत २०% सबस्क्रिप्शन 'इतकी' चालू आहे जीएमपी किंमत काय करते कंपनी जाणून घ्या....

प्रतिनिधी: आजपासून बाजारात इंडोगल्फ क्रॉपसायन्स लिमिटेड (Indogulf Cropsciences Limited) कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होत आहे.त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी संधीचे आणखी एक कवाड खुले झाले आहे. आज २६ जून पासून ते ३० जूनपर्यंत कंपनीचा आयपीओ बाजारात असेल. कंपनीने प्राईज बँड किंमत (Price Band) १०५ मे १११ रूपये प्रति समभाग (Share) निश्चित केली आहे. १३५ समभागांचा एक गठ्ठा (Lot) उपलब्ध असणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीओत कमीत कमी १४१७५ रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

सकाळी १२ वाजेपर्यंत बिडिंग (Bidding) मधील पहिल्याच दिवशी किरकोळ गुंतवणूकदारांकडून ०.३४% पटीने, ० टक्क्याने पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार व ०.१२ टक्क्याने विना संस्थात्मक गुंतवणूकदारकडून सबस्क्रिप्शन मिळाले .एकूण सर्व प्रवर्गातून कंपनीला ०.२० पटीने म्हणजेच कंपनीला १२ वाजेपर्यंत २०% सबस्क्रिप्शन मिळाले आहे. बाजारातील माहितीनुसार, कंपनीचे शेअर्स मूळ निश्चित किंमतीपेक्षा ९% हून अधिक प्रिमियम दराने (Grey Market Price GMP)विक ले जात आहेत.

३ जुलैपासून आयपीओ बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. तसेच कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा आयपीओ बीएसई (BSE),एनएसई (NSE) यावर नोंदणीकृत होईल. सिस्टिमॅटिक कॉर्पोरेट सर्विसेस लिमिटेड (Systematix Cor porate Service Limited) ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग (Book Leading) मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (Big Share Services Pvt Ltd) कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार असेल असे कंपनीने सांगितले. एकूण २०० कोटींचा हा आयपीओ असणार आहे. त्यातील ४० कोटी मूल्यांकनाचा समभागांची ऑफर फॉर सेल (OFS) माध्यमातून विक्री होणे अपेक्षित आहे. १ जुलैपर्यंत समभागाचे पात्र गुंतवणूकदारांना वाटप होणे अपेक्षित आहे आयपीओतील एकूण गुंतवणूकीपैकी ५०% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (Qualified Institutional Investors QII) यांच्यासाठी, १५% वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदार (Non Institutional Investors NII) व किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) यांच्यासाठी ३५% वाटा निश्चित करण्यात आलेला आहे असे कंपनीने म्हटले आहे यापूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदार (Anchor Investors) यांच्याकडून ५८.२० कोटींची निधी उभारणी केली आहे.

ओमप्रकाश अग्रवाल, संजय अग्रवाल, अंशू अग्रवाल,अर्नव अग्रवाल हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओआधी कंपनीच्या प्रवर्तकांचा भागभांडवल हिस्सा ९६.८६% आहे. आयपीओतील गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकी नंतर प्रवर्तकांचे भागभांडवल निश्चित होणार आहे.

कंपनीला आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील डिसेंबर २४ पर्यंत ४६६.३१ कोटींचा महसूल (Revenue) मिळाला होता जो मार्च २०२४ मधील ५५५.७९ कोटींवरुन घटला आहे. याखेरीज कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) मध्ये मार्च २०२४ मधील २८.२३ कोटींवरून घसरत नफा डिसेंबर २४ पर्यंत २१.६८ कोटींवर पोहोचला. कंपनीच्या मार्च महिन्यातील १५४.५६ कोटी तुलनेत थकबाकी वाढत डिसेंबर २४ पर्यंत थकबाकी २०६.३० कोटींवर पोहोचली आहे. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit Before Tax EBITDA) मार्च २४ मधील ५५.७४ कोटींच्या तुलनेत डिसेंबर २४ पर्यंत ४४.७८ कोटींवर घसरण झाली.

बाजारातील माहितीनुसार, कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ७०१.५४ कोटी रूपये आहे. ही कंपनी प्रामुख्याने पिकांच्या (क्रॉप) उत्पादनाचे संरक्षण, विपणन (Marketing)तसेच पिकांच्या न्यूट्रीअंटस (Nutrient) व पिकांचे जैविक विज्ञान उत्पादन करणारी कंपनी आहे. शेतकी विज्ञान या क्षेत्राशी संबंधित कंपनी २०१९ साली स्थापन झाली होती.

आयसीएलला भारत सरकारने 'टू स्टार एक्सपोर्ट हाऊस' म्हणून मान्यता दिली आहे. त्यांनी १९९३ मध्ये कामकाज सुरू केले आणि प्रामुख्याने पीक संरक्षण, वनस्पती पोषक तत्वे आणि जैविक या तीन व्यवसायिक क्षेत्रांतर्गत काम करतात, जे किरकोळ आणि संस्थात्मक ग्राहकांना पीक उत्पादन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतात. कंपनी सर्व प्रकारच्या उपलब्ध फॉर्म्युलेशनमध्ये जसे की वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल (DG), सस्पेंशन कॉन्सन्ट्रेट (SC), कॅप्सूल सस्पेंशन (CS), अल्ट्रा-लो व्हॉल्यूम (ULV), इमल्शन इन वॉटर (EW), सोल्युबल ग्रॅन्युल (SG), फ्लोएबल सस्पेंशन (FS) इत्यादींमध्ये विस्तृत श्रेणीतील उत्पादने तयार करते आणि विपणन (Marketing) करते.

आयसीएलचा वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ धान्ये, डाळी आणि तेलबिया, फायबर पिके, लागवड आणि फळे आणि भाज्यांसह पिकांच्या विस्तृत श्रेणीची पूर्तता करतो. शाश्वत शेती आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाला प्रोत्साहन देताना पीक उत्पादन सुधारण्यासाठी त्याची उत्पादने डिझाइन केलेली आहेत. त्यांची पीक संरक्षण उत्पादने ९०% पेक्षा जास्त महसूल निर्माण करतात असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर खेळत्या भांडवल (Working Capital) गरजेसाठी, कंपनीच्या भूतकाळातील देणी चुकती करण्यासाठी, भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure), व इतर दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

Devil Worm : पृथ्वीच्या गर्भातील गुप्त जगाचा चकित करणारा शोध; रहस्यमय 'डेव्हिल वर्म' आणि भूगर्भातील अथांग जीवसृष्टी

तुम्ही जर जमिनीखाली खड्डा खोदून पृथ्वीच्या पोटात उतरू लागलात तर काही वेळातच तुमचा श्वास गुदमरून जीव कासावीस होऊ

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी..., भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा

Phuket delhi air india flight Turbulence : हवेत अचानक लागला भीषण झटका अन् प्रवासी थेट छतावर आदळले! एअर इंडियाच्या विमानात ताणतणाव आणि किंचाळ्या; १७ जण जखमी

नवी दिल्ली : विमानातून प्रवास करताना "सीटबेल्ट बांधा" अशी सूचना मिळणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र, मंगळवारी

Rohit Sharma Selection Controversy : रोहित शर्माच्या निवडीवरून BCCI विरुद्ध निवड समिती? आगरकर कोंडीत; पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे?

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वरिष्ठ खेळाडूंच्या निवडीवरून चर्चांना उधाण आले आहे. रोहित शर्माच्या (Rohit

Devendra Fadnavis : जातपडताळणी समितीच्या कामकाजात राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही!

मनोज जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; कोणत्याही मंत्र्याने जाणीवपूर्वक प्रमाणपत्रे रद्द

Nashik News : सिडकोतील अतिक्रमणांवर मनपाचा बुलडोझर, अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्या हटवल्या

Nashik News : सिडको येथील स्टेट बँक चौपाटीलगत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेच्या