Sunday, January 18, 2026

Himachal Pradesh: हिमाचलमध्ये ढगफुटी झाल्याने हाहाकार! अचानक आलेल्या पुराने २ जणांचा मृत्यू, २० जण गेले वाहून

Himachal Pradesh: हिमाचलमध्ये ढगफुटी झाल्याने हाहाकार! अचानक आलेल्या पुराने २ जणांचा मृत्यू, २० जण गेले वाहून

मंडी: हिमाचल प्रदेशात बुधवारी ढगफुटी झाल्याने अचानक पूर आला आणि मुसळधार पावसामुळे २ जणांचा मृत्यू झाला. तर २० जण वाहून गेल्याची शक्यता आहे. कांगडा जिल्ह्याच्या मनुनी खड्ड येथून दोन मृतदेह हाती घेण्यात आले. तर इंदिरा प्रियदर्शिनी जलविद्युत परियोजनेच्या ठिकाणी एका कामगार कॉलनीत राहणाऱे १५ ते २० जण वाहून गेल्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पावसामुळे या परियोजनेचे काम थांबवण्यात आले होते. त्यामुळे कामगार या जवळच्या ठिकाणी आराम करत होते. तेव्हा मनुनी खड्ड आणि जवळच्या नाल्यातील पाणी वाढले आणि हे कामगार वाहून गेले.

कुल्लूमध्येही अनेक ठिकाणी पुरामुळे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये एक वाहन चिखलातील पाण्यात वाहताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची पातळी उंचावली.

 
Comments
Add Comment