पिंपरी महापालिकेत डी आर सी घोटाळा उघड

पिंपरी : महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता दिनेश फाटक आणि कनिष्ठ अभियंता संभाजी गायकवाड यांनी तत्कालीन आयुक्त श्रावण हार्डिकर यांचा मनाई आदेश असतानाही मोशी येथील गट क्रमांक ४४४ /१/ १ /१ चा डी आर सी ( विकास हक्क प्रमाणपत्र Devlopment Right सर्टिफिकेट) रावेत प्राधिकरण येथे वापरून चुकीच्या पद्धतीने परवानगी देऊन करोडो रुपयांचा घोटाळा केला असल्याचे उघड झाल्याने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी फाटक आणि गायकवाड यांची पाणी पुरवठा विभागात तडका फडकी बदली केली आहे, तसेच त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.


पिंपरी चिंचवड महापालिका बांधकाम विभागामध्ये उपअभियंता दिनेश फाटक आणि कनिष्ठ अभियंता संभाजी गायकवाड हे कर्मचारी कार्यरत असून त्यांनी मोशी येथील गट क्रमांक ४४४/१/ १ /१ या मिळकतीचा डी आर सी ( विकास हक्क प्रमाणपत्र ) क्रमांक ३२0४ हे रावेत प्राधिकरण से.न. २९ प्लॉट ३३,३४,३४अ या मिळकतीवर बेकायदापणे वापरून महापालिकेचे करोडो रुपयाचे नुकसान केले आहे. विशेष म्हणजे मोशी येथील या मिळकतीचा डी आर सी वापरू नये असे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एका आदेशाद्वारे बांधकाम विभागाला कळविले असताना वरिष्ठ आधिकाऱ्यांची दिशाभूल करून हे कृत्य केल्याने महापालिकेचे नुकसान तर झालेच आहे शिवाय बदनामीही झाली आहे.


याप्रकरणी आयुक्त शेखर शिंह यांच्याकडे तक्रार आल्याने आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्याकडे खुलासा मागविला असता समाधानकारक उत्तर न आल्याने आयुक्तांनी उप अभियंता दिनेश फाटक आणि कनिष्ठ अभियंता संभाजी गायकवाड यांची बांधकाम विभागातून तडका फडकी पाणी पुरवठा विभागात बदली केली असून त्या दोघांची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.

Comments
Add Comment

समृद्धी महामार्गावर खिळे नाही, तर ॲल्युमिनिअम नोजल्स! बेशिस्त कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

एमएसआरडीसीचे स्पष्टीकरण मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खीळे लावण्यात आल्याचे काही

सागरी मंडळाच्या प्रकल्पांना विविध परवानगी मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करा

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सर्वसंबंधितांना सूचना मुंबई : महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या

समृद्धी महामार्गावरील निष्काळजीपणानंतर खिळे काढले, वाहतूक पुन्हा सुरळीत

पुणे: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा पुन्हा चर्चेत आला आहे. या महामार्गावर सतत वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात

बंजारा समाजाचा धडक मोर्चा; मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करा

सोलापूर : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) मधून आरक्षण द्यावे, अशी मागणी

भावी पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम राबवणार! म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या

मुंबई: भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरण पूरक काही

मनोज जरांगे यांची आणखी एक नवी मागणी... ओबीसी नेत्यांमध्ये मोठी खळबळ

संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदानात ५ दिवस उपोषण करत, सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण