Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मीडियातील अस्तित्वाची चौकशी होणार

अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मीडियातील अस्तित्वाची चौकशी होणार
वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेत जाण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मीडियातील अस्तित्वाची (Social Media P10resence) चौकशी होणार आहे. जगातील प्रत्येक व्यक्ती जी अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करेल त्याची किंवा तिची पोलीस चौकशी आणि सोशल मीडियातील अस्तित्वाची चौकशी होणार आहे. जर व्हिसाचा अर्ज करणाऱ्या विरोधात गुन्हे नोंदवले असतील तर त्या गुन्ह्यांचे स्वरुप बघितले जाईल. सोशल मीडियात संबंधित व्यक्ती अमेरिकेची समर्थक आहे की विरोधक हे बघितले जाईल. अमेरिकेच्या एखाद्या धोरणाला व्हिसाचा अर्ज करणाऱ्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विरोध होत असेल किंवा विरोध होईल अशी शक्यता वाटली तरी व्हिसा नाकारला जाणार आहे. अमेरिकेच्या नव्या नियमानुसार व्हिसाचा अर्ज करणाऱ्याला मागील पाच वर्षातील सोशल मीडियातील स्वतःच्या अस्तित्वाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. माहिती देताना फसवणूक केली अथवा दिशाभूल केली तरी व्हिसाचा अर्ज फेटाळला जाणार आहे. ज्यांचा व्हिसा अर्ज फेटाळला आहे त्यांना भविष्यातही अमेरिकेचा व्हिसा मिळण्याची शक्यता कमी होणार आहे. अर्जदारांनी DS-160 व्हिसा अर्जावर मागील पाच वर्षात वापरलेल्या सर्व सोशल मीडिया अकाउंट / हँडल / पेज आदींची माहिती देणे बंधनकारक आहे. या माहितीआधारे संबंधित अर्जदाराच्या सोशल मीडियातील अस्तित्वाची चौकशी होणार आहे. अर्जदारांनी फॉर्मवर स्वाक्षरी करण्यापूर्वी आणि सबमिट करण्यापूर्वी त्यांच्या व्हिसा अर्जात दिलेली माहिती बरोबर असल्याचे प्रमाणित करावे, असाही नियम करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आणि अखंडत्वासाठी ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियमात बदल केल्याचे जाहीर केले आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >