Saturday, October 25, 2025
Happy Diwali

ऊर्जा विभागाच्या कामकाजाचा बोर्डीकर यांनी घेतला आढावा

ऊर्जा विभागाच्या कामकाजाचा बोर्डीकर यांनी घेतला आढावा

मुंबई  : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर ऊर्जा पंपाची मागणी पूर्ण करावी. महावितरण, महाजनको आणि महानिर्मितीने वीज निर्मिती आणि वीज बचतीचे उपक्रम प्रभावीपणे राबवावे असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

एच.एस.बी.सी.बँक, फोर्ट येथे महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्याच्या कामकाजाचा आढावा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर घेतला. महापारेषणचे कार्यकारी संचालक सतीश चव्हाण, कार्यकारी प्रकल्प संचालक अविनाश निंबाळकर, कार्यकारी संचालक श्रीमती सुचित्रा भिकाने, मुख्य अभियंता पीयूष शर्मा, संचालक वित्त बाळासाहेब थिटे, संचालक संचालन, संजय मारुडकर, प्रकल्प संचालक अभय हरणे, कार्यकारी संचालक नितीन वाघ यासह विभागातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्याच्या वीज निर्मितीचे प्रकल्प आणि त्यांची सद्यस्थिती, महाअभिकरण ऊर्जा, विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत आढावा घेतला. विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मागेल त्याला कृषी पंप योजना, केंद्र व राज्य शासनाच्या इतर विविध योजना यांची माहिती यावेळी बैठकीत सादर करण्यात आली.

Comments
Add Comment