
५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
नवी दिल्ली : "आज भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात तत्कालीन काँग्रेस सरकारने लोकशाहीला वेठीस धरले होते, अशा शब्दांमध्ये आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.We salute every person who stood firm in the fight against the Emergency! These were the people from all over India, from all walks of life, from diverse ideologies who worked closely with each other with one aim: to protect India’s democratic fabric and to preserve the ideals…
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2025
आज भारताच्या लोकशाही इतिहासातील एका काळ्याकुट्ट पर्वाला पन्नास वर्षे पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहलं आहे की, "आज भारताच्या लोकशाही इतिहासातील एका काळ्याकुट्ट पर्वाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत – आणीबाणीची घोषणा. हा दिवस भारतातील जनता 'संविधान हत्या दिवस' म्हणून ओळखते. या दिवशी भारतीय संविधानात नोंदवलेली मूल्ये बाजूला ठेवली गेली, मूलभूत अधिकार रद्द करण्यात आले, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले आणि अनेक राजकीय नेते, समाजसेवक, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांना तुरुंगात डांबण्यात आले. जणू त्या काळात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने लोकशाहीलाच बंदिवासात टाकले होते."
३ जणांना फाशी, ७०० जणांना अटक... इराणमध्ये मोसादच्या 'अंडरकव्हर एजंट्स'विरुद्ध जलद कारवाई
इराण इस्रायलच्या अंडरकव्हर एजंट्सविरुद्ध जलद कारवाई तेहरान: इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी (Iran Israel Ceasefire) झाली जरी असली तरी, तणाव काही कमी झालेला ...