Wednesday, June 25, 2025

Stock Market Analysis:'प्रहार'शेअर बाजार विश्लेषण,शेअर बाजाराची उसळी! स्मॉलकॅपचा करिश्मा दुसऱ्यांदा कायम सेन्सेक्स ७०० तर निफ्टी २०० अंकाने उसळला 'ही'कारणे जबाबदार!

Stock Market Analysis:'प्रहार'शेअर बाजार विश्लेषण,शेअर बाजाराची उसळी! स्मॉलकॅपचा करिश्मा दुसऱ्यांदा कायम सेन्सेक्स ७०० तर निफ्टी २०० अंकाने उसळला 'ही'कारणे जबाबदार!
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात वाढ कायम राहिली आहे.सेन्सेक्स ७००.४० अंकाने वधारत ८२७५५.५१ पातळीवर तर निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांकात २००.४९ अंकांची वाढ झाल्याने निफ्टी पातळी २५२४४.७५ पातळीवर पोहोचली आहे.बाजारातील पाठिंबा पातळी (Support Level) ही अखेरपर्यंत कायम राहिल्याने ही वाढ दिसत आहे.विशेषतः सेन्सेक्स (Sensex),निफ्टी (Nifty) यामधील स्मॉलकॅपमध्ये झालेल्या वाढीने बाजारात चैतन्याचे वातावरण कायम राहिले आहे.विशेषतः दोन्ही स्मॉलकॅपमध्ये १.४५% वाढ झाली असताना सलग दुसऱ्यांदा स्मॉलकॅपचा करिश्मा कायम राहिला आहे.याशिवाय दोन्ही बँक निर्देशांकांत किरकोळ वाढ कायम राहिली आहे.

सेन्सेक्स बँक निर्देशांकात ११६.३० अंकांने वाढ झाली असून बँक निफ्टी निर्देशांकात १७२.४५ अंकांने घसरण अखेरच्या सत्रात झाली.अखेरच्या सत्रापर्यंत इंडियन अस्थिरता निर्देशांक वीआयएक्स (Indian Volatility Index VIX) यामध्ये ४.३८% घसरण झाली आहे त्यामुळे कालच्या तुलनेत बाजाराची स्थिती आणखी मजबूत झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये सकाळप्रमाणेच सगळ्या समभागात वाढ झाली आहे.सर्वाधिक वाढ मिडिया (२.२०%),कंज्युमर ड्युरेबल्स (१.४४%),तेल व गॅस (०.१९%),मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.१०%),हेल्थकेअर (०.८६%),मिडस्मॉल हेल्थकेअर (१.३६%),रिअल्टी (०.३१%)समभागात वाढ झाली आहे.नुकसान कोणत्याही समभागात झालेले नाही.

आजची एकूणच परिस्थिती पाहता बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास साफ नजरेने झळकत आहे.इस्त्राईल इराण यांच्यातील युद्धाविरामामुळे त्याचा मोठा फायदा बाजारातील भावनावर झालेला दिसून आला.केवळ देशात नाही तर जगभरा त या गोष्टीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.त्यामुळे युएस,आशिया व युरोप बाजारानेही त्याला चांगला प्रतिसाद दिला होता.फेडचे अध्यक्ष जेरोमी पॉवेल यांनी काल फेडरल व्याजदरात कपातीबाबत म्हणताना सुतोवाच केले होते की आगामी काळातील अर्थविश्वातील परिस्थिती पाहता थांबून निर्णय घेतला जाईल.त्याचमुळे काही काळातील परिस्थितीचा भारतावर चांगला परिणाम होऊ शकतो. लवकर दरात न कपात करता तसाच राहिलास मोठ्या संख्येने परदेशी संस्था त्मक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करू शकतात.

मात्र गेल्या काही काळात भारतातील फंडामेंटल मजबूत असल्याने जागतिक नुकसान आटोक्यात ठेवण्यास मदत झाली आहे.किरकोळ गुंतवणूकदारांनीही आपल्या गुंतवणूकीत तसेच म्युचल फंड गुंतवणूकीत वाढ केल्याचा फायदा बाजारात झाल्याने बाजारातील इनफ्लो (Inflow)वाढण्यास मदत झाली आहे.एचडीबी फायनान्शियल आयपीओ गुंतवणूकीत बाजारात तरलता (Liquidity) निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी १ लाख कोटींचा व्हीआरआरआर लिलाव (VRRR Auction) आयोजित करत असल्याच्या बातमीचा परिणाम झाला होता.एचडीबी फायनांंशियल सर्विसेस आयपीओला संध्याकाळपर्यंत एचडीबी आयपीओचे एकूण सबस्क्रिप्शन ०.२८% पहिल्या दिवशी भरले गेले.याखेरीज महत्वाच्या घडामोडीत एमसीएक्स शेअर ७% वधारल्याने गुंतवणूकदारांचा एकात्मिक भावनांवर चांगला परिणाम झाला.आयपीओनंतर सन्मान कॅपिटलचा समभाग चांगलाच १४% ने उसळला आहे.याखेरीज ग्लोबल सिव्हिल प्रोजेक्ट लिमिटेडच्या आयपीओला दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत एकूण १३.१८ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे तर आजपासून बिडिंगसाठी खुला असलेल्या संभव स्टील ट्यूब्ज कंपनीला ०.३० पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते.एचडीबी वगळता इतर दोन आयपीओला अजूनही अपेक्षित प्रतिसाद किरकोळ गुंतवणूकदारांकडून मिळालेला नाही.परंतु एस अँड पी ग्लोबलने भारतीय जीडीपी वाढीची शक्यता ६.५% पर्यंत होईल असे म्हटल्यानंतर बाजारात आणखी प्राण आले आहेत.

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या विक्रीला आत्मसात करत आहेत,ज्यामुळे बाजाराला आधार मिळाला आहे.भारतीय बाजाराचे फंडामेंटल मजबूत असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे मागील सत्रात आंतरराष्ट्रीय परिस्थिती जिकरची असतानाही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात ५,२६६ कोटी किमतीच्या भारतीय शेअर्सची विक्री केली असली तरी दुसरीकडे,घरगुती गुंतवणूकदारांनी ने ५,२०९.६० कोटी किमतीच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली.

एकूण २४ जूनपर्यंत विचार केल्यास,जूनमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रोख क्षेत्रात ३,२४३.१८ कोटी किमतीचे भारतीय शेअर्सची विक्री केली आहे तर घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ६७,५८७.६७ कोटी किमतीचे भारतीय शेअर्स खरेदी केले होते.आजच्या दिवसभरात स्थिर कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Price) आणि डॉलर निर्देशांकाचाही देशांतर्गत बाजारातील भावनांवर परिणाम झाला आहे.मध्यपूर्वेतील तणाव असूनही,कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ८० डॉलरच्या खाली आल्या आहेत.

आज सोन्याच्या दरातही २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याच्या दरात २७ रूपयांची व २२ कॅरेट सोने प्रति ग्रॅम दरात २५ रूपयांची घसरण झाली होती व चांदीत प्रति किलो १००० रुपयाने घसरण झाली होती. सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत केवळ ०.१०% वाढ झाली होती.तर कच्च्या तेलाच्या WTI Futures मध्ये घसरलेली किंमत पुन्हा वधारून किंमतीत १.०६% वाढ झाली आहे तर Brent Futures निर्देशांकात १.१३% वाढ झाली आहे.डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ७५ पैशाने वधारल्याने रूपयांची किंमत ८६.१२ रूपयांवर पोहोचली होती. परकीय चलनसाठा वाढत असताना सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे रूपयांच्या किंमतीत आधारभूत पातळी राखण्यात मदत झाली होती.

आज अखेरच्या सत्रापर्यंत वाढ किर्लोस्कर ब्रदर्स (१९.२७%),सम्मान कॅपिटल (१४.८१%),नेटवर्क १८ (१३.६३%),ईआयडी प्यारी (EID Parry)(९.४३%),केएनआर कन्स्ट्रक्शन (८.०६%),एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी (६.९४%),इंडिया सिमेंट (६.४१%),एमसीएक्स (५.५३%),अनंतराज (५.५२%),पेज इंडस्ट्रीज (५.२२%),रामकृष्ण फोर्ज (४.९८%),नुवामा वेल्थ (४.९१%),कल्याण ज्वेलर्स (३.६७%),जे एम फायनांशियल (३.०३%),टायटन कंपनी (३.६२%),सिमेन्स एनर्जी इंडिया (३.४६%),टीव्हीएस मोटर्स (२.८९%),महिंद्रा अँड महिंद्रा (२.३८%),इंडियन हॉटेल्स (२.३०%),श्री सिमेंट (२.२३%),ग्रासीम इंडस्ट्रीज (२.०३%),अदानी पॉवर (१.९७%),इन्फोसिस (१.९६%),जेएसबब्लू स्टील (१.९१%),बजाज फायनान्स (१.१५%) या समभागात झाली आहे.

आज अखेरच्या सत्रापर्यंत सर्वाधिक घसरण गार्डन रिच (५.६५%),डेटा पॅटर्न (४.९१%),एजंल वन (३.२५%),भारत इलेक्ट्रॉनिक (२.९७%),माझगाव डॉक (२.०७%),सीपीसीएल (२.६१%),डिक्सन टेक्नॉलॉजी (२.३५%),झेन टेक्नॉलॉजी (२.१२%),भारत डायनॅमिक (१.९९%),हिंदुस्थान एरोनॉटिक्स (१.९२%),युनियन बँक (१.०९%), सेल (१.०९%),भारत फोर्ज (१.५६%),कोटक महिंद्रा बँक (१.२४%),सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोलूशन (०.९५%),आयशर मोटर्स (०.९३ %),जेल इंडिया (०.९१%),वेदान्ता (०.९०%),एबीबी इंडिया (०.६५%),जिंदाल स्टील (०.६०%),ओएनजीसी (०.८७%),इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (०.५२%),वरूण बेवरेजेस (०.४६%) इंडसइंड बँक (०.३१%) या समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,'युद्ध विरामाचा हळूहळू परिणाम दिसायला लागला.कच्चे तेलाचे भाग कमी झालेले दिसतात.इराण इस्त्राईल अमेरिका तिघांनी ही परिस्थि ती स्विकारलेली दिसत आहे. त्याचाच परिणाम आज बाजारावर दिसत आहे.अनेक महिन्यांपासूनच या युद्धाची तयारी सुरू होती.अधूनमधून छोट्या कुरबुरी सुरु राहतील.पण आता बाजार अमेरिकाआर्थिक पातळीवर कसा राहील,तेथे दर कपात होईल का या सगळ्याकडे लक्ष ठेऊन आहे.जिओ पोलिटिकल (भौगोलिक राजकीय)परिस्थिती सुधारली तर जगात शांतता नांदेल. तरच शेअर बाजारात स्थिरता येईल.आजचा दिवस तरी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन थोडा खुश आहे.बघू बाजाराला पुढील कुठुन 'ट्रिगर 'मिळतो ते‌ !आगामी स्थितीत अमेरिकन बाजारात आर्थिक आकडे चांगले अपेक्षित आहेत.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये सुधारणा झाली आहे.एफआयआय भांडवल काढून घेत असताना,सकारात्मक जागतिक संकेत देशांतर्गत बाजारातील गती टिकवून ठेवण्यास मदत करत आहेत.लार्ज-कॅप स्टॉक्स,विशेषतः आयटी आणि ऑटो,चांगली कामगिरी करत आहेत,त्यांना मजबूत डॉलर आणि सुधारित जोखीम क्षमतेमुळे मदत झाली आहे.स्थानिक पातळीवर,अनुकूल मान्सूनचा अंदाज आणि चलनवाढ कमी होत असल्याने आशावाद आणखी बळकट होत आहे.जरी नवीन यूएस टॅरिफची शक्यता संभाव्य अडथळा दर्शवते,तरी जवळच्या काळात बाजारातील भावना मोठ्या प्रमाणात सकारात्मक राहते.'

आजच्या बाजारातील निफ्टी हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,'सुरुवातीच्या जोरदार सुरुवातीनंतर निर्देशांक बहुतांशी सकारात्मक राहिला. शेअर्समध्ये खरेदीची आवड वाढत असताना भावना सुधारत आहेत. इस्रायल आणि इराणमधील संघर्षानंतर झालेल्या युद्धबंदीमुळे तेजीत असलेल्या व्यापाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे,जे आता निफ्टीला २५,७५० पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवत आहेत. तात्काळ प्रतिकार २५,३५० वर आहे.या पातळीपेक्षा जास्त ब्रेकआउटमुळे तेजी २५,७५० पर्यंत वाढू शकते.नकारात्मक बाजूने,२४,८२०-२५,००० झोन एक महत्त्वाचा आधार म्हणून काम करत राहण्याची शक्यता आहे. कॉल ओ आय अनवाइंडिंग (Call OI Unwinding) च्या उलट,अतुलनीय पुट लेखन (Bullish Aggression) व्यापाऱ्यांच्या तेजीच्या आक्रमकतेचे प्रतिबिंबित करते.'

आजच्या बाजारातील एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी व करंसीचे व्हिपी जतीन त्रिवेदी म्हणाले की,'गेल्या दोन सत्रांमध्ये तीव्र नफा बुकिंगनंतर कॉमेक्सच्या किमती ३,३२० डॉलर आणि ३,३३५ डॉलरच्या दरम्यान स्थिर राहिल्याने एमसीएक्समध्ये सोन्याचा भाव सुमारे ९७,२२० रूपयांच्या आसपास मर्यादित श्रेणीत व्यवहार झाला.गुंतवणूकदार आता पुढील प्रमुख ट्रिगर्सची वाट पाहत आहेत,ज्यामध्ये फेड चेअर जेरोम पॉवेल यांची साक्ष,यूएस जीडीपी डेटा आणि कोअर पीसीई किंमत निर्देशांक यांचा समावेश आहे,जे फेडच्या व्याजदराच्या दृष्टिकोनासाठी दोन्ही महत्त्वाचे निर्देशक आहेत.प्रमुख अमेरिकन आर्थिक डेटापूर्वी अनिश्चितता असल्याने,सोन्याचा अल्पावधीत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.सोन्यासाठी अपेक्षित व्यापार श्रेणी ९६,००० ते ९८,५०० रूपयांची आहे.'

त्यामुळेच आगामी दिवसात विशिष्ट समभागातील हालचालीवर लक्ष ठेवणे,आयपीओतील हालचाली,फेडच्या धर्तीवर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक व घरगुती किरकोळ गुंतवणूकदारांचा प्रतिसाद यावर यावर बाजाराची पुढील दिशा निर्धारित ठरू शकते.
Comments
Add Comment