Friday, January 16, 2026

Numerology: वयाच्या ३५ वर्षानंतर प्रचंड संपत्ती मिळवतात या ३ तारखांना जन्मलेले लोक

Numerology: वयाच्या ३५ वर्षानंतर प्रचंड संपत्ती मिळवतात या ३ तारखांना जन्मलेले लोक

मुंबई: अंकज्योतिषामध्ये प्रत्येक अंकाचे खास महत्त्व आहे. १ ते ९ अंकांचा संबंध ग्रह, राशी आणि नक्षत्रांशी जोडलेला आहे. अंक ज्योतिषामध्ये ८ या मूलाकांचे महत्त्व अधिक सांगितले आहे. या मूलांकाचा स्वामी शनि देव आहे.

जर एखाद्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला झाला असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक ८ असतो. अशा लोकांवर शनिची विशेष कृपा राहते. मूलांक ८च्या व्यक्तींच्या जीवनात सुरूवातीला खूप संघर्ष असतो. त्यांना यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

मात्र जेव्हा हे लोक वयाची ३५वर्षे ओलांडतात तेव्हा शनीच्या साडेसातीचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. मूलांक ८ असलेल्यांच्या करिअरमध्ये अचानक यश, बिझनेसमध्ये फायदा आणि आर्थिक स्थितीत सुधारणा पाहायला मिळते.

जेव्हा शनी देव प्रसन्न होतात तेव्हा मूलांक ८ असलेल्यांच्या जीवनात चमत्कारिक बदल येतात. या लोकांच्या जीवनात एका रात्रीत आर्थिक सुधारणा दिसतात. मूलांक ८ असलेल्या व्यक्तींसाठी शुभ दिन शनिवार आणि शुक्रवार आहे. सोबतच या लोकांसाठी संध्याकाळची वेळ शुभ मानली जाते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >