प्रतिनिधी:एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) हा समभाग सध्या धूमाकूळ घालत आहे.या समभाग (Share) ने एका वर्षात ११७% परतावा व एका महिन्यात २६% परतावा दिला आहे.आज दुपारपर्यंत कंपनीच्या समभागा त ५.२६% टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच एमसीएक्स आपल्या किंमतीच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे.विशेषतः २६ मे पर्यंत या समभागात ३६% वाढ झाली आहे. यामुळे या तिमाहीत कंपनीने बंपर परतावा आपल्या गुंतवणूकदारांना दिला असून सकाळच्या सत्रात हा शेअर ७% वधारला होता. प्रामुख्याने परदेशी रेटिंग व ब्रोकरेज संस्थेनी 'Buy Call' दिल्यानंतर या शेअर्समध्ये तेजी आली आहे.अपेक्षेपेक्षाही ही तेजी अधिक दिसून आली आहे. त्यामुळेच एमसीएक्सची कामगिरी पाहता ब्रोकरेज कंपन्यानी यांची लक्ष्य किंमत (Target Price) ७ हजारावरून १० हजार रूपयांवर केली आहे.
विशेषतः आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीमुळे एमसीएक्सवरील कमोडिटी व्यवहाराची स्थिती अनुकूल झाली होती.ज्याच्या फायद्याने कंपनीच्या व्यवहारातील संख्येत (Volume) मध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली होती.याशिवाय एमसीएक्स ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवनवीन प्रयोग करत नवी आर्थिक उत्पादने मागील दोन महिन्यांत बाजारात आणल्यामुळे एमसीएक्स वरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.परिणामी ब्रोकरेज कंपन्यांच्या रेटिंगनंतर या समभागा त जबरदस्त वाढ होत आहे.
पहिल्याच तिमाहीत कंपनीच्या एडीवी (Average Daily Volume) मध्ये ५०% वाढ झाली होती.तसेच कंपनीच्या ऑप्शन्स प्रिमियम व्यवहारात ३०% वाढ झाली होती.अलीकडेच कंपनीने वीज उत्पादक, वितरक तसेच मोठ्या ग्राहकांना अस्थिरता आणि हेज किंमत जोखीम व्यवस्थापित करण्यास मदत करण्यासाठी वीज डेरिव्हेटिव्ह्ज उत्पादन लाँच केले होते.