३ जणांना फाशी, ७०० जणांना अटक... इराणमध्ये मोसादच्या 'अंडरकव्हर एजंट्स'विरुद्ध जलद कारवाई

इराण इस्रायलच्या अंडरकव्हर एजंट्सविरुद्ध जलद कारवाई


तेहरान: इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी (Iran Israel Ceasefire)  झाली जरी असली तरी, तणाव काही कमी झालेला नाही. इराणने आता इस्रायलविरुद्ध देशांतर्गत कारवायांना सुरुवात केली आहे. आज सकाळी इराणने इस्रायलसाठी हेरगिरी आणि हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली तीन जणांना फाशी दिली. तसेच, १२ दिवसांच्या इराण-इस्रायल युद्धादरम्यान इस्रायलशी संबंध असल्याच्या आरोपाखाली इराणने ७०० जणांना अटक केली आहे. (Iran action against Israeli Spy)


इराण इस्रायलच्या अंडरकव्हर एजंट्सविरुद्ध जलद कारवाई करत आहे. इस्रायलसाठी हेरगिरी आणि हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली इराणने आज सकाळी तीन जणांना फाशी दिली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने जारी केलेल्या निवेदनानुसार, इद्रिस अली, आझाद शोजई आणि रसूल अहमद  यांनी हत्येसाठी वापरलेली उपकरणे इराणमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील तिन्ही आरोपींविरुद्ध खटला चालवण्यात आला आणि बुधवारी सकाळी उर्मिया शहरात त्यांना फाशी देण्यात आली.



फाशी कुठे देण्यात आली?


उर्मिया हे इराणचे वायव्य शहर आहे, जे तुर्की सीमेजवळ आहे. फाशीची पुष्टी करताना, इराणी माध्यमांनी निळ्या कैद्यांच्या गणवेशातील तीन आरोपींचे फोटो देखील प्रसिद्ध केले आहेत. मुळात, इराणने असे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. इराण अनेकदा इस्रायल आणि इतर परदेशी गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून लोकांना अटक आणि मृत्युदंडाची शिक्षा जाहीर करतो.



इराणची जलद कारवाई


१३ जून २०२५ रोजी इराण आणि इस्रायलमधील युद्ध सुरू झाल्यानंतर, इराणने इस्रायलला मदत करणाऱ्यांवर जलद आणि कठोर कारवाईचा इशारा दिला होता. या क्रमाने, काही आरोपींना रविवार आणि सोमवारीही फाशी देण्यात आली. १२ दिवसांच्या युद्धादरम्यान इराणने ७०० लोकांना अटक केली. ही माहिती राज्य-समर्थित मीडिया एजन्सी 'नूर न्यूज'ने दिली आहे. गुप्तचर माहिती लीक केल्याचा आरोप रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या सर्वांवर इस्रायलची गुप्तचर संस्था 'मोसाद'शी संबंधित असल्याचा, गुप्त माहिती शेअर करण्याचा, लष्करी तळांना लक्ष्य करण्यात मदत करण्याचा आरोप आहे. इराणचे म्हणणे आहे की यातील अनेक आरोपींची चौकशी केली जात आहे आणि काहींना लवकरच शिक्षा होऊ शकते.

Comments
Add Comment

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक अनुभवाची संधी! युनेस्कोचा इंटर्नशिप प्रोग्राम, आताच करा अर्ज

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. युनेस्कोने

भारतानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानचे पाणी अडवणार!

काबूल : भारतानंतर आता तालिबानशासित अफगाणिस्तान पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा मर्यादित करण्याची आणि नदीवर धरणे

रशियातील महत्त्वाच्या दोन तेल कंपन्यांवर ट्रम्पचे निर्बंध, रशियावर येणार आर्थिक दबाव! भारतालाही बसणार का फटका?

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर आर्थिक दबाव आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

सौदी अरेबियामध्ये मोठा निर्णय; ‘कफला’ पद्धतीचा शेवट, भारतीय कामगारांना मोठा दिलासा

सौदी अरेबिया : सौदी अरेबियामध्ये गेल्या ५० वर्षांपासून अस्तित्वात असलेली कफला पद्धत अखेर रद्द करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये अचूक फेकला 'टोमॅटो बॉम्ब'

पाकिस्तानमध्ये टोमॅटाचा भाव गगनाला भिडला, एक किलोसाठी मोजावे लागत आहेत ७०० रुपये! कराची : भारतात झालेल्या

ट्रम्प यांचा ८८ लाख रुपयांचा एच-१बी 'व्हिसा बॉम्ब' आजपासून लागू, जाणून घ्या कोणाला सूट मिळणार

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, H-1B