HDB Financial Services IPO Day 1: कंपनीला दुपारी १२ पर्यंत १३ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले 'ही' आहे GMP Price

प्रतिनिधी:एचडीबी फायनांशियल सर्विसेस कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात दाखल होत आहे. एचडीबी फायनांंशियल सर्विसेस (HD Financial Services) कंपनीने आयपीओ (IPO) पूर्वीच ३३६९ कोटींची निधीची उभारणी अँकर गुंतवणूकदार (Anchor Investors)कडून केलेली आहे. तर कंपनीने ऑफर फॉर सेल (OFS) साठी १०००० कोटी मूल्यांकनाचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. आजपासून येत असलेल्या आयपीओला दुसऱ्याच दिवशीच्या बारा वाजेपर्यंत १३ पटीने सबस्क्रिप्शन (Subscription) मिळाले आहे. कंपनीने ७००- ७४० रूपये प्रति समभाग प्राईज बँड (Price Band) निश्चित केला होता. मात्र आताच्या घडीला १५ रूपये प्रिमियम दराने (Grey Market Price GMP) दराने या समभागाची विक्री होत आहे.


१४१ अँकर गुंतवणूकदारांकडून ही गुंतवणूक मिळवण्यात कंपनीला यश आले आहे. ७४० रूपये प्रति समभाग (Shares) प्रमाणे कंपनीने ४.५५ इक्विटी समभागांचे वाटप केले. क्रिसीलने दिलेल्या अहवालानुसार ही कंपनी ३१ मार्च २०२४ पर्यंत सातवी सगळ्यात मोठी विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) कंपनी ठरली आहे. ९०२.२ अब्ज रुपये कर्ज पुरवठा (Loan Book) केलेली ही कंपनी ठरली होती. ११६४७८९६३ समभागांच्या बिडींग (Bidding) स्विकारण्यात कंपनीला यश आले याआधी कंपनीने बिडींगसाठी ११७३२३९२ समभाग ऑफर केले होते. एचडीएफसी बँकेची युनिट असलेली एचडीबीला तुलनात्मकदृष्ट्या समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. १२५०० कोटींच्या आयपीओत यापूर्वीच कंपनीने एलआयसी, गोल्डमन सच, ब्लँकरॉक, इतर म्युचल फंडानी सुमारे ३३०० कोटींची उभारणी केली होती. आजपासून सुरू असलेला आयपीओ २७ जूनपर्यंत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. बहुतेक बाजार तज्ञांनी या आयपीओला 'सबस्क्राईब' करा असा सल्ला दिला होता.


तज्ञांनी नोंदवलेल्या मतानुसार कंपनीने आपली स्पर्धक बजाज फायनान्स, चोलामंडलम फायनान्स यांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली होती. मागील तिमाहीत कंपनीच्या मालमत्तेवर परतावा (Return on Assets ROA) हा २.२%, व इक्विटीवरील परतावा (Return on Equity ROE) १४.७% दिला होता. तज्ञांच्या मते, श्रीराम फायनान्स, व एल अँड टी फायनान्सपेक्षा कंपनीच्या जीएनपीए (GNPA) व एनएनपीए (NNPA) मध्ये चांगली कामगिरी केली होती.


एकूण आयपीओपैकी ४४.९२% वाटा गुंतवणूकीसाठी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB), १३.४८% वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII), किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) साठी ३१.४४% वाटा आरक्षित करण्यात आला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी कमीत कमी १४००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. बजाज ब्रोकिंग रिसर्चनेही आपल्या अहवालात या आयपीओला भविष्यातील दिर्घकालीन गुंतवणूकीसाठी आयपीओला सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिला आहे.


२००७ मध्ये स्थापन झालेली, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही एक रिटेल-केंद्रित, एनबीएफसी आहे जी विविध कर्ज आणि सहाय्यक सेवा प्रदान करते. क्रेडिट प्रदान करण्याव्यतिरिक्त, कंपनी तिच्या प्रवर्तकाला (Promoter) ला बीपीओ सेवा देखील प्रदान करते. बॅक-ऑफिस ऑपरेशन्स, कलेक्शन आणि सेल्स सपोर्टसह—विमा उत्पादन वितरण सारख्या शुल्क-आधारित ऑफरसह प्रामुख्याने तिच्या कर्ज देणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करते. कंपनी एका ओम्नी-चॅनेल 'फिजिटल' मॉडेलद्वारे कार्य करते जे एक विस्तृत शाखा नेटवर्क, समर्पित इन-हाऊस टेलि-कॉलिंग टीम आणि बाह्य भागीदार आणि वितरण चॅनेलचे नेटवर्क एकत्रित करते.



एचडीबीचा व्यवसाय तीन वर्टिकलमध्ये संरचित आहे:


एंटरप्राइझ लेंडिंग (Enterprise Lending): २००८ मध्ये सुरू झालेले, ते एमएसएमई आणि काही पगारदार व्यक्तींना सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज प्रदान करते.


असेट फायनान्स (Asset Finance): व्यावसायिक वाहने, बांधकाम उपकरणे आणि ट्रॅक्टर यासारख्या उत्पन्न देणाऱ्या मालमत्तेसाठी वित्तपुरवठा देते.


ग्राहक वित्त (Customer Loans) : घरगुती किंवा जीवनशैलीच्या गरजांसाठी व्यक्तींना वैयक्तिक कर्जे प्रदान करते.


३१ मार्च २०२५ पर्यंत, कंपनीने ३१ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील १,१७० शहरांमध्ये १,७७१ शाखा चालवल्या, ज्यापैकी ८०% पेक्षा जास्त शाखा भारतातील शीर्ष २० शहरांच्या बाहेर आहेत.कंपनीला सकाळी ११ वाजेपर्यंत पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून कुठलेही सबस्क्रिप्शन मिळाले नव्हते तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.१५% सबस्क्रिप्शन तर किरकोळ गुंतवणूकदारांकडून ०.११%, कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ०.७५%, रिझर्व्ह (०.२०%) सबस्क्रिप्शन मिळाले होते.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

पुणे महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल आंदेकर; प्रभाग २३ मध्ये धंगेकरांना धक्का

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मधून एक वेगळाच राजकीय निकाल समोर आला आहे. नाना पेठ आणि

Pune Andekar Family : सूनेनंतर सासूनेही मारलं मैदान ! पुण्यात लक्ष्मी आंदेकरचा थरारक विजय

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मध्ये चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत सूनेनंतर आता

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या