प्रतिनिधी: सलग दुसऱ्यांदा सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावात मध्यपूर्वेकडील युद्धविरामामुळे सोन्यात लक्षणीय घट झाली आहे. इराण इस्त्राईल यांच्यातील युद्धाविरामामुळे सोन्याच्या गुंतवणू कीत चालू असलेल्या नफा बुकिंग (Profit Booking) मध्ये घसरण झाली. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील चिंता नष्ट झाल्याखेरीज सोने चांदीतील मागणी घटल्याने सोनाच्या दरात घसरण झाली आहे.'गुडरिटर्न्स ' या संकेतस्थळावरील माहिती नुसार,आज २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमतीत २७ रूपयांची घसरण झाली त्यामुळे प्रति ग्रॅम दर ९८९५ रूपयांवर पोहोचली आहे. तर २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत २५ रूपयांनी घटल्याने प्रति ग्रॅम सोने ९०७० रूपयांवर पोहोचले आहे. आज भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट प्रति तोळा किंमतीत २७० रूपयांनी घसरण झाल्याने प्रति तोळा किंमत ९८९५० रूपयांवर पोहोचली आहे तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत २५० रूपयांनी घसरल्याने प्रति तोळा किंमत ९०७०० रूपयांवर पोहोचली आहे.
१८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत २१ रूपयांनी घटल्याने किंमत ७४२१ रूपयांवर पोहोचली आहे तर प्रति तोळा किंमत २१० रूपयांनी घसरत ७४२१० रूपयांवर पोहोचली आहे. भारतातील मुंबई पुण्यासह प्रमुख शहरांत सरासरी किंमत २४ कॅरेट साठी ९९०० रूपये प्रति ग्रॅम तर २२ कॅरेटसाठी ९०७० रूपयांवर कायम आहे. जागतिक बाजारपेठेत गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये दुपारपर्यंत ०.३९% वाढ झाली होती. तर भारतीय बाजारातील कमोडिटी बाजार म्हणजेच एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) यावर सोन्याच्या निर्देशांकात ०.३७% वाढ झाल्याने सोने पातळी ९७३८०.०० या किरकोळ किंमत पातळीवर गेली आहे. सकाळपर्यंत सोन्याच्या फ्युचर निर्देशांकात २.६२% घसरण झाल्याने भारतीय बाजारात ही पातळी राखण्यात यश आले होते.
११ जूनपासूनच्या सत्रात सर्वात कमी पातळी गाठल्यानंतर, स्पॉट सोन्याचा भाव ०.५% ने घसरून प्रति औंस ३,३५१.४७ डॉलरवर आला. अमेरिकन सोन्याचा वायदा ०.९% ने घसरून ३,३६५.३० डॉलरवर आला. स्पॉट चांदी ०.१% ने घसरून प्रति औंस ३६.१० डॉलरवर आला होता. काल युएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी त्यांचे वेट अँड वॉच" रेट धोरण कायम ठेवले आहे. जरी त्यांनी म्हटले की कमी महागाई आणि कमकुवत कामगार भरतीमुळे लवकर व्याजदर कपात होऊ शकते. यामुळे पुढील महिन्यात संभाव्य व्याजदर कपातीसाठी दार उघडे आहे, ज्यामुळे अमेरिकन डॉलर (USD) कमी होत आहे आणि सोन्यात घसरण होत किंमतीला आधार मिळत आहे.
चांदीत किरकोळ वाढ!
सोन्याच्या दरात चांगली घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात शुल्लक घसरण झाली आहे. प्रति ग्रॅम चांदीच्या दरात १ रुपयांवर घसरण झाली असून प्रति किलो दरात १००० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर प्रति किलो १०८००० रूपयांवर पोहोचले आहेत. एमसीएक्सवरील चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत ०.५७% वाढ झाल्याने चांदीची पातळी १०५५१७.०० रूपयांवर पोहोचली होती.