Finolex Cables: पुण्याच्या प्रतिष्ठित पालखी सोहळ्यादरम्यान फिनोलेक्स केबल्सचा वारकरी समुदायाला पाठिंबा

प्रतिनिधी: आपल्या मूळ स्रोतांना मानवंदना आणि समाज कल्याणाच्या सततच्या प्रतिबद्धतेच्या रूपाने,  भारतातील विद्युत व संप्रेषण केबल उत्पादक कंपनी फिनोलेक्स केबल्सने पालखी कार्यक्रमादरम्यान वारकरी समुदायाला आपला दरवर्षीप्रमाणे पाठिंबा सुरू ठेवला आहे. फिनोलेक्स गेल्या सहा वर्षांपासून पालखीला पाठिंबा देत असून, सांस्कृतिक वारसा जपण्याची आणि स्थानिक समुदायांची सेवा करण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली असल्याचे कंपनी प्रवक्त्यांनी याप्रसंगी म्हटले.

शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या आध्यात्मिक पालखी यात्रेत लाखो वारकरी देहू आणि आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना, ही यात्रा शुक्रवार सकाळपासून सुरू झाली. फिनोलेक्स केबल्स त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले — त्यांच्या पालखी प्रवासाचा अनुभव सुखकर व्हावा यासाठी प्रत्यक्ष मदत तसेच पिशव्या आणि गांधी टोपीचे वाटप करण्यात आले असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. विशेषतः आमच्या मूळ शहर पुण्यात हा उपक्रम ब्रँडच्या समुदायांना उन्नतीसाठी आणि सेवा देण्यासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे असेही कंपनीने म्हटले.

अमित माथूर, अध्यक्ष – विक्री आणि विपणन, फिनोलेक्स केबल्स, याविषयी बोलताना म्हणाले आहेत की,'पालखी ही भक्ती, सहनशीलता आणि समुदायभावनेचं सजीव प्रतीक आहे.पुणेस्थित ब्रँड म्हणून,ज्यांनी आमचं अस्तित्व घडवायला मदत केली त्या लोकांप्रती आणि संस्कृतीप्रती आम्ही कृतज्ञ आहोत आणि त्यांच्यासाठी काहीतरी परत देणं ही आमची जबाबदारी मानतो. पालखी दरम्यान आमचे प्रयत्न हे वारकऱ्यांप्रती आमच्या ऐक्याचे एक छोटंसं प्रतीक आहेत.'

फिनोलेक्स केबल्सने नेहमीच व्यवसायिक उत्कृष्टतेसोबत सामाजिक उद्दिष्टांची सांगड घालण्यावर विश्वास ठेवला आहे. सर्वांसाठी अधिक समावेशक आणि जोडलेले भविष्य घडवण्यासाठी तसेच पालखीसारख्या कार्यक्रमांना पाठिंबा देऊन, कंपनी प्रगती आणि परंपरेच्या दरम्यान पूल बांधण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे असा दावा कंपनीने केला आहे.
Comments
Add Comment

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नाव नोंदणी

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नाव नोंदणी मुंबई : फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक

अभिषेक शर्माने रचला इतिहास, टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० षटकार ठोकले!

दुबई: आशिया कप २०२५ च्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा ने ऐतिहासिक कामगिरी केली

IND vs PAK: धुलाई झाली तर भडकले पाकचे गोलंदाज, अभिषेक शर्मा-हरिस रौफ यांचा मैदानातच राडा

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीतील भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं.

दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य!

बदाम, पिस्ता, खजूर प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त मुंबई (प्रतिनिधी) : खजूर, बदाम, पिस्ता हे खाण श्रीमंतीचे

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

सातही धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे भरल्याने

IND vs PAK: कधी सुधारणार पाकिस्तान? हे पाहून तुम्हाला चीड आल्याशिवाय राहणार नाही

दुबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-४ च्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा