Thursday, January 15, 2026

अकरावीचा कट ऑफ उद्या जाहीर होणार

अकरावीचा कट ऑफ उद्या जाहीर होणार

पुणे : अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी राज्यातील १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यींनी नोंदणी केली आहे. पहिल्या कॅप फेरीचे कनिष्ठ महाविद्यालयांचे कट ऑफ गुरुवार (दि.२६) जाहीर होणार असून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय वाटपही जाहीर होईल. अकरावी प्रवेशासाठी ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थी प्रवेश क्षमता २१ लाख २३ हजार ७२० असून त्यापैकी कॅप फेरी साठी प्रवेश क्षमता १६ लाख ६० हजार ८४ तसेच कोटा प्रवेश क्षमता ४ लाख ६३ हजार ६३६ इतकी आहे. ४ जुलैला रिक्त जागा जाहीर झाल्यावर तात्काळ दुसरी प्रवेश फेरीही सुरु होईल. कॅप फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी २६ जूनला जाहीर होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा