आदिवासी गरोदर महिलेला डोलीतून नेण्याची नामुष्की !

  44

ठाण्याच्या दुर्गम भागातील समस्या आजही कायमच


ठाणे : एकीकडे देशभर राजकीय पुढारी व भारतीय जनता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तर दुसरीकडे येथील आदिवासी जनता रस्ता, वीज,पाणी ,आरोग्य सारख्या सुविधा पासून वंचित असल्याचे वेदनादायी चित्र येथील दुर्गम भागात पहायला मिळत आहे. शहापूरातील नडगाव नजीकच्या पाड्यात एका गरोदर महिलेला रस्त्याअभावी डोलीतून अडीच कि.मी.चा प्रवास करत न्यावे लागले आहे.


शहापूर तालुक्यातील नडगाव जवळील चाफेवाडी हे गाव सुमारे १०० वर्षापासून वसलेल्या शहापूर तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या या पाड्यात जाण्यासाठी रस्ताच नाही. सोमवारी दुपारच्या सुमारास चाफे पाडा येथील सविता रवींद्र मुकणे या गरोदर मातेला त्रास होऊ लागल्याने तिला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात न्यायचे होते. रुग्णवाहिका बोलवण्यात आली परंतु रस्ता नसल्याने रुग्णवाहिका २ किलोमीटर दूरच थांबवावी लागली गावातील महिला व पुरुष मंडळींनी गरोदर मातेला रुग्णवाहिके पर्यंत घेऊन जाण्यासाठी चादरीची डोली तयार केली .


डोलीत गरोदर मातेला ठेवून तिला पाड्यातील पायावाट व पाण्याचे नाले तुडवत गरोदर मातेची डोली खांद्यावर घेत डोली रुग्णवाहिकेपर्यत आणली व त्या रुग्णवाहिकेतून गरोदर माता व काही महिला भगिनींनी १० किलोमीटरच्या शासकीय रुग्णालयाकडे कूच केली. मात्र शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणलेल्या सविता मुकणे या गरोदर मातेला रुग्णालयात आकडी आल्याने तिची प्रकृती बिघडली म्हणून तिला तात्काळ ठाणे जिल्हाधिकारी सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे.अनेक वर्षांपासून येथील गावातील नागरिकाना दवाखाना,बाजारहाट साठी,दोन ते अडीच किलोमीटर पायी चालून डोंगर चढ उतार करीत बाजारपेठ, हॉस्पिटल गाठण्याची वेळ येत आहे.


गरोदर माता असो वा अन्य गभीर आजारी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी डोली करून २ किलोमीटर दूरवर पायी प्रवास करावा लागतोय. २ किमी पायी प्रवास व तिथून पुढे वाहणाने इच्छित स्थळी जाण्याची वेळ आदिवासी बांधवावर येत आहे.हे चित्र नक्की बदलणार तरी कधी असा प्रश्न यानिमित्ताने येथे उपस्थीत होत आहे.


आदिवासी गावपाड्यांवरील प्रलंबित ६४ रस्त्यांपैकी ३४ रस्ते हे खाजगी जमिनीतून जातात. त्याबाबतचे अधिकार मा. तहसीलदार यांना असून त्यांनी ते वापरावेत यासाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. तसेच उर्वरित ३० रस्ते वनाच्या जागेतील असून १५ ठिकाणी ३/२ चे प्रस्ताव मंजूर आहेत. हे सर्व रस्ते व्हावेत यासाठी आम्ही मागील वर्षी आंदोलनही केले होते. - प्रकाश खोडका, सचिव शहापूर तालुका श्रमजीवी संघटना.

Comments
Add Comment

जखमी गोविंदांसाठी सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष

ठाणे : दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषात साजार होत असला तरी उंच थरावरून पडून अनेक गोविंदांचे बळी जातात. सणाला गालबोट

ठाण्यात एक हजारांपेक्षा जास्त दहीहंड्या

डोंबिवली (प्रतिनिधी) : दहीहंडीची पंढरी ही ठाणे जिल्ह्याची ओळख जागतिक पातळीवर प्रसिद्धीस

चिकन मटण विकण्यास बंदी, खाण्यास नाही; केडीएमसी प्रशासनाने दिली माहिती

डोंबिवली : स्वातंत्र्यदिनी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत चिकन मटण आदी मांसाहार खरेदी विक्री करण्यास बंदी

Dahi Handi 2025 : ढाक्कुमाकुम… ढाक्कुमाकुम! मुंबई-ठाण्यात गोविंदांचा जल्लोष, यंदा कुठे मिळणार विक्रमी बक्षीस? जाणून घ्या A टू Z माहिती

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि जल्लोषाचा अनोखा माहोल निर्माण करणाऱ्या दहीहंडी उत्सवाला

Ban on Meat Sales : १५ ऑगस्टला मांसविक्रीवर बंदी! कोणकोणत्या शहरांत लागू होणार ‘नो मीट डे’? जाणून घ्या...

कल्याण : १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राज्यातील काही महापालिकांनी मांस-मटण विक्रीवर बंदी

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन