फ्रान्समध्ये १४५ जणांवर सिरिंज हल्ले, १२ अटकेत

पॅरिस : फ्रान्समधील फेटेस दे ला म्युझिक महोत्सवावेळी धक्कादायक घटना घडली. कार्यक्रम सुरू असताना ठिकठिकाणी गर्दीतील नागरिकांवर इंजेक्शन सिरिंजद्वारे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये एकूण १४५ जण जखमी झाले. इंजेक्शन सिरिंजद्वारे झालेल्या हल्ल्यांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे.

हल्ल्यांसाठी वापरलेल्या इंजेक्शन सिरिंजमध्ये काय होते, हे अद्याप पोलिसांनी सांगितलेले नाही. इंजेक्शन सिरिंजद्वारे झालेल्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या १४५ जणांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जखमींमध्ये महिला आणि तरुणींची संख्या मोठी आहे. प्राथमिक वृत्तानुसार जखमी झालेल्यांपैकी किमान तीन जणांची तब्येत खालावली आहे. हल्ला झाल्यानंतर त्यांची तब्येत एकदम बिघडली. या जखमींवर उपचार सुरू आहेत.

जेवढे नागरिक जखमी झाले त्या सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. पोलीस हल्लेखोरांची कसून चौकशी करत आहेत. हल्ल्यांमागील उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी कायदेशीर कारवाईसाठी ज्या ज्या ठिकाणी हल्ले त्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आहे. या फूटेजची बारकाईने तपासणी सुरू आहे.
Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त