
दिनांक १३ जून रोजी पोलो सामना खेळताना संजय कपूर यांचे अचानक निधन झाल्याने, त्यांचे कुटुंब आणि करिश्मा कपूरची दोन्ही मुलं समायरा आणि कियान यांना धक्का बसला. त्यांच्या अंत्यविधिला तसेच शोकसभेला संपूर्ण कपूर कुटुंबीय हजर राहिले. बॉलीवूडचे काही निकटवर्तीय देखील उपस्थित होते. ज्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात संजय कपूर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाताना दिसतो. हा व्हिडिओ त्यांच्या एका जवळच्या मित्राने शेअर केला आहे.
पहा संजय कपूर यांचा अखेरचा व्हिडिओ
Last rescue video of Sanjay Kapoor 🙏match between Sajjan jaisal and Sanjay team,sujjan also there 🐎
Very sad time for all horse lovers, Rest in peace my friend 🙏 #sanjaykapoor #polo pic.twitter.com/vWHWFFoqqg
— Ajit Nandal 🐎Indian Cowboy (@AjitNandal) June 14, 2025
माजी हॉकी खेळाडू अजित नंदल यांनी काही दिवसांपूर्वी संजय कपूर यांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये डॉक्टरांची एक टीम सीपीआरद्वारे त्यांचे प्राण वाचवताना दिसत आहे. अजित नंदल आणि संजय कपूर हे घनिष्ट मित्र होते. अजित नंदलने आपल्या ट्विटर अकाउंटवर संजयचा शेवटचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, 'संजय कपूरचा जीव वाचवतानाचा हा शेवटचा व्हिडिओ. सामना संजय कपूर आणि सज्जन जैसलच्या टीममध्ये होता, सुज्जन नावाचा घोडा देखील तिथे उपस्थित होता. सर्व घोडेप्रेमींसाठी हा खूप दुःखद काळ आहे. तुझ्या आत्म्यास शांती लाभो माझ्या मित्रा.'
अजित नंदल यांनी संजय कपूरच्या निधनावर काय म्हटले?
अजित नंदल यांनी १३ जून रोजी त्यांचा मित्र संजय कपूर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या आठवणीत त्यांनी ट्विटरवर लिहिले, 'घोडेप्रेमींसाठी ही खूप दुःखद सकाळ आहे. एक अद्भुत माणूस, एक महान पोलो खेळाडू, घोडा प्रेमी आणि मनाने सर्वोत्तम व्यक्ती असलेले संजय कपूर यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी इंग्लंडमध्ये निधन झाले. पोलो सामन्यादरम्यान त्यांनी मधमाशी गिळली आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.'
संजय कपूरचे २००३ मध्ये करिश्मा कपूरशी लग्न झाले होते. नंतर दोघांना समायरा आणि कियान ही दोन मुले झाली. पण २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. संजयचे करिश्मासोबतचे हे दुसरे लग्न होते. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये प्रिया सचदेव सोबत तिसरं लग्न केलं. संजय यांना तीन पत्नीपासून एकूण चार मुले आहेत.