Actor Srikanth Arrest : दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक!

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ग्रेटर चेन्नई पोलिसांनी सोमवारी (दि. २४) एका सुरू असलेल्या तपासात मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीच्या आधारे ही अटक केली. कायदेशीर प्रक्रियेनुसार, अटक केल्यानंतर श्रीकांतला न्यायालयात दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यापूर्वी किलपॉक मेडिकल कॉलेज रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. चेन्नईतील एग्मोर येथील ज्युडिशियल ऑफिसर्स क्वार्टर्समधील दंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सुनावणी झाली. वकील विघ्नेश रामनाथन यांनी श्रीकांतची बाजू मांडली. सुनावणीनंतर, त्याला ७ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.



मीडिया रिपोर्टनुसार, एआयएडी एमके च्या आयटी विंगचा पदाधिकारी टी. प्रसाद याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही कारवाई झाली. प्रसादवर श्रीकांतला प्रतिबंधित अंमली पदार्थ पुरवल्याचा आरोप आहे. प्रसादच्या चौकशीदरम्यान, अधिकाऱ्यांना अभिनेत्याच्या ड्रग्ज नेटवर्कमधील सहभागाचे पुरावे सापडले. या माहितीच्या आधारे अभिनेता श्रीकांतला ताब्यात घेण्यात आले. नुंगमबक्कम पोलीस ठाण्यात त्याची नऊ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले. नंतर या नमुन्यांची तपासणी केली असता, त्यात अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले.


४६ वर्षीय श्रीकांतने १९९९ मध्ये दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या 'जन्नल - मराबू कविताइगल' या दूरचित्रवाणी मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये, विशेषतः तमिळ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. २००२ मध्ये 'रोजा कूटम' या रोमँटिक ड्रामाद्वारे त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले, ज्यामुळे त्याला लोकप्रियता मिळाली आणि तमिळ चित्रपटसृष्टीत त्याचे स्थान निर्माण झाले. त्याने 'आनंदपुरम डायरीज', 'उप्पूकंदम ब्रदर्स बॅक इन ॲक्शन' यांसारख्या अनेक मल्याळम चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रदीप चिलकुरी दिग्दर्शित 'अर्जुन S/O वैजयंती' हा त्याचा अलीकडचा चित्रपट आहे.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये