ना. भुजबळांकडून लासलगावी पुलाच्या कामाची पाहणी

मुख्य बाजारपेठेतील पुलाचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश


लासलगाव : लासलगाव पाटोदा रस्त्यावरील परिसरातील अनेक गावांना जोडणाऱ्या लासलगाव मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्यात यावे अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ लासलगाव पाटोदा रस्त्यावर लासलगाव मुख्यबाजार पेठेत ४.५० कोटी निधीतून पुलाचे काम करण्यात येत आहे.
या सुरू असलेल्या कामाची मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. त्यावेळी ते सबंधित अधिकाऱ्यांशी बोलत होते.


यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी.आर.घोडे, अभियंता संकेत चौधरी, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, पांडुरंग राऊत, विलास गोरे, बबन शिंदे, माधव जगताप यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


लासलगाव पाटोदा रस्त्यावरील बाजारपेठेतील पुलाच्या कामाला पुढे साठलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे कामास अडथळा येत आहे. याबाबत तातडीने या बंधाऱ्याचे गेट खोलून द्यावे अशा सूचना तहसीलदार विशाल नाईकवाडी व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.


तसेच पाटोदा रस्त्यावरील हा पूल अनेक गावांना जोडणारा आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन महिन्याच्या आत या पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.



शिवनदी संवर्धन कार्यारंभ आदेश द्या


राज्य नदी संवर्धन योजनेच्या माध्यमातून शिवनदी संवर्धनासाठी १२.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र कार्यारंभ आदेश नसल्याने काम अद्याप सुरू झालेले नाही. याबाबत पाहणी दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत तातडीने या कामाला कार्यारंभ आदेश देऊन काम सुरू करण्यात यावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या.

Comments
Add Comment

पाहुणे आले आणि दागिने चोरून पसार झाले

नाशिक : घरात मुक्कामासाठी आलेल्या पाहुण्यांनी रात्रीच्या सुमारास घरातील १८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून

अंत्ययात्रेची तयारी झाली पण खोकल्याने वाचला तरुणाचा जीव!

नाशिक : अपघातामध्ये जखमी झालेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तरुण मृत झाल्याचा माहितीवरून परिवाराने

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकुळ

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसात विविध ठिकाणी तीन बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले. जिल्ह्यात

कांदा खरेदी करूनही नाफेड' , एनसीसीएफने थकविले बळीराजाचे पैसे

नाशिक : राज्यामध्ये केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांनी शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी करून देखील

नदी परिसरात वापरलेल्या जिलेटिन कांड्या सापडल्याने खळबळ

नाशिक: नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरामध्ये असलेल्या नंदिनी नदीच्या परिसरात वापरलेल्या जिलेटिनच्या कांड्या

३९९ बिनातिकीट रेल्वे प्रवाशांवर कारवाई

भुसावळ विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम : २ लाख ३७ हजार ७१० दंड वसूल नाशिक : भुसावळ विभागातील भुसावळ, जळगाव, मनमाड,