Sunday, October 26, 2025
Happy Diwali

मंत्री नितेश राणे भारतात ५ व्या क्रमांकावर ट्रेंड!

मंत्री नितेश राणे भारतात ५ व्या क्रमांकावर ट्रेंड!

द्विटरवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त द्विटरवर सुरू झालेला #HBDNiteshRane हा द्विटर हॅशटॅग देशभरात टॉप ५ मध्ये ट्रेंड झाला. तर #NiteshRaneJi हा हॅशटॅग दहाव्या क्रमांकावर होता. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या ट्रेंडमध्ये सहभागी होऊन मंत्री नितेश राणे यांना शुभेच्छा दिल्या.

सोशल मीडियावर मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या लोकप्रियतेचा पुरावा आहे. मंत्री नितेश नारायण राणे यांचा वाढदिवस २३ जून २०२५ रोजी पार पडला. तत्पूर्वी मंत्री राणे यांनी २२ जून रोजी, जुहू येथील त्यांच्या 'अधिश' निवासस्थानी मुंबईसह राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या, तर २३ जूनला कणकवली येथे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांना सन्मानपूर्वक शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाच्या निमित्ताने द्विटरवर #HBDNiteshRane या हॅशटॅगचा ट्रेंड सुरू होऊन काही तासांतच हा हॅशटॅग देशभरात टॉप ५ क्रमांकावर आला. हा ट्रेंड म्हणजे मंत्री नितेश राणे यांच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

?si=Dv1V6LoRdOA-TLm0
Comments
Add Comment