Kartiki Gaikwad : लेकाला मांडीवर घेऊन कार्तिकी गायकवाड पार पाडतेय आईचं कर्तव्य, शेअर केला मुलाचा गोड विडिओ

मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील कार्तिकी गायकवाड नावाजलेली गायिका आहे. कार्तिकी गायकवाडने आजवर अनेक गाणी गायली आहेत. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची कार्तिकी विजेती ठरली होती. या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने ती प्रसिद्धीझोतात आली. गायनासह कार्तिकी सोशल मीडियावरही फार सक्रिय असते. यामार्फत ती तिच्या गायनाच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ सतत पोस्ट करत असते. अशातच कार्तिकीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओने प्रेक्षकांसह कलाकारांचंही लक्ष वेधलं आहे.



कार्तिकीने इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा सांगीतिक मैफिलीतला व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती गाणं गाताना दिसत आहे, तर यावेळी तिच्यासोबत तिचा मुलगा रिशांक तिच्या मांडीवर बसलेला पाहायला मिळतोय. आई गाणं गात असताना तो शांतपणे ते ऐकत असल्याचं दिसत आहे. कार्तिकीने या व्हिडीओला “रिशांकसोबतची कार्यक्रमाच्या तालमीच्या वेळेची एक गोड आठवण” असं खास कॅप्शन दिलंय.





कार्तिकीने शेअर केलेल्या या गोड व्हिडीओला तिच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओखाली गायिका मुग्धा वैशंपायनने “अगं कसा गोड बघतोय तो”, असं म्हटलंय तर प्रथमेश लघाटेनेही “क्लास” असं म्हणत कमेंट केली आहे. अभिनेत्री मेघना एरंडेनेही कमेंट करत कार्तिकीच्या बाळाचं कौतुक केलं आहे. यासह एका नेटकऱ्याने “तो बोलत असेल माझी आई किती गोड गाते”, तर दुसऱ्याने “किती गोड दिसतोय आणि शांत बसला आहे”, असं म्हटलं आहे.


कार्तिकीने रोनित पिसेसह डिसेंबर २०२० रोजी लग्न केलं होतं. त्यांनतर कार्तिकीने १४ मे २०२४ रोजी तिला मुलगा झाल्याची गुड न्यूज सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. यापूर्वी तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वीच तिने मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. अशातच गायिकेच्या भावाचंही नुकतंच लग्न झालं आहे. यावेळी तिने तिच्या भावाच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

Comments
Add Comment

बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले

मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही

प्राजक्तानं नंदीवरुन घेतलेली एन्ट्री योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला.

रीलस्टार जोडपं निघाले सराईत चोर! आयफोन 17 प्रो मॅक्स, साडे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये...

अहिल्यानगर: जिल्हा पोलिस दलाने बसमधून महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत जोडप्याला जेरबंद केले आहे. या

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्या-फुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी