तोंडावर आपटले ट्रम्प,, युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणचे हल्ले सुरूच

तेल अविव: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहेत.  इराण इस्रायलमध्ये मध्यस्ती करत आपण दोन्ही देशांत शस्त्रसंधी केल्याची घोषणा केल्यानंतर, काही तास उलटत नाही तर इराणने इस्रायलवर हल्ला करत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.  आपण किती मोठे शांतीचे पुरस्कर्ते आहोत, हे दाखवून देण्याचा ट्रम्प यांचा नेहमी प्रयत्न असतो. मात्र यामुळे संपूर्ण जगात त्यांचे हसं होत आहे.

गरजेपेक्षा जास्त बोलणे आणि स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याच्या त्यांच्या या सवयीमुळे जगत त्यांच्या शब्दाला काहीच किंमत राहिली नसल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. . भारत-पाकिस्तानच्या बाबतीत जे त्यांनी केलं, तेच आता इराण-इस्रायलच्या बाबतीत ट्रम्प यांनी केलं आहे. रात्री उशिरा ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराण-इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली होती. "आपण हे युद्ध थांबवलं असा त्यांचा दावा होता. पण काहीवेळ आधी पुन्हा हल्ले सुरु झाले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचा दावा किती निराधार, खोटा आहे ते जगासमोर आहे.  ट्रम्पच्या घोषणानंतर ही इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर मिसाइल हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

इराण कुणाचं ऐकत नाही, अमेरिका सुद्धा टार्गेट  


इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर मिसाइलचा पाऊस पाडला. इराण फक्त इस्रायलवर मिसाइलच डागत नाहीय, तर अमेरिका सुद्धा त्यांचं टार्गेट आहे. मिडल ईस्टमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर मिसाइल हल्ले सुरु आहेत. आधी कतर मग इराकमधील अमेरिकेच्या तीन ठिकाणांवर मिसाइल हल्ला झाला आहे. या हल्ल्यांवरुन इराणचा इरादा किती मजबूत आहे ते दिसून येतं. मध्य पूर्वेतील हा तणाव आणखी वाढू शकतो हे स्पष्ट आहे.

बुहतांश मिसाइल्स हवेतच नष्ट


इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरन वाजत आहेत. लोक बंकर्सच्या दिशेने पळत आहेत. काल रात्री इराणने कतरमधील अमेरिकेच्या अल-उदीद एअरबेसवर मिसाइल हल्ला केला. त्यांनी एकाचवेळी अनेक मिसाइल्स डागली. पण अमेरिकेने बुहतांश मिसाइल्स हवेतच नष्ट केली. सध्या इथे कुठलं नुकसान झाल्याच वृत्त नाहीय. अल उदीद एअर बेस मिडल ईस्टमधील अमेरिकन सेंट्रल कमांडच्या एअर ऑपरेशन्सच मुख्यालय आहे. इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्लाह खामेनेई यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केलीय. त्यात त्यांनी लिहिलय की, “आम्ही कुठल्याही परिस्थिती हल्ला सहन करणार नाही. आम्ही कोणासमोर झुकणार नाही” “इराण अमेरिकेच्या कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला तयार आहे” असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.
Comments
Add Comment

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील