Tuesday, June 24, 2025

IPO GMP Today: आजपासून बाजारात तीन आयपीओ! जाणून घ्या इत्यंभूत माहिती 'या' किंमतीत सुरू GMP.... 'इतक्या' वेळा मिळाले सबस्क्रिप्शन!

IPO GMP Today: आजपासून बाजारात तीन आयपीओ! जाणून घ्या इत्यंभूत माहिती 'या' किंमतीत सुरू GMP.... 'इतक्या' वेळा मिळाले सबस्क्रिप्शन!
प्रतिनिधी: आजपासून शेअर बाजारात तीन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहेत. आज Kalpataru Ellenbarrie Industrial Gases, Globe Civil Projects हे आयपीओ दाखल झाले आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आयपीओपूर्वीच कल्पतरू कंपनीने अँकर गुंतवणूकदार (Anchor Investors) यांच्याकडून ७०८ कोटींचा निधी उभारला आहे. याप्रमाणेच या तिन्ही आयपीओला आज सुरूवात झाली आहे. या आयपीओविषयी सगळी माहिती पुढीलप्रमाणे -

१) Kalpataru Limited - कल्पतरू लिमिटेड कंपनीचा आयपीओ (IPO) आज २४ ते २७ जून या कालावधीत हा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. २७ जूनला आयपीओचे वाटप निश्चित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार, कंपनीने गुंतवणूकदारांसाठी Price Band ३८७ ते ४१४ रूपये प्रति समभाग (Share) निश्चित केलेला आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी ३६ गठ्ठे (Lot) खरेदी करावे लागतील तर कमीत कमी १३९३२ कोटींची गुंतवणूक किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) यांना करावी लागणार आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जेएम फायनांशियल लिमिटेड, नमुरा फायनांशिल अँडव्हायजरी अँड सिक्युरिटीज लिमिटेड या कंपन्या आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत तर एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे.कंपनीने आधीच अँकर गुंतवणूकदारांकडून ७०८ कोटींचा निधी उभारला आहे. एकूण १५९० कोटींचा हा आयपीओ असणार आहे. सध्या मिळत असले ल्या माहितीनुसार कंपनीचा जीएमपी (Grey Market Price GMP) हा ५% प्रिमियम दराने पहिल्या दिवशी विकला जात आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कल्पतरूचा एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी ७५% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (Qualified Institutional Investors QIB) यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे. तर १०% वाटा किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) साठी, तसेच विना संस्थात्मक गुंतवणूकदार (Non Institutional Investors NII) यांच्यासाठी १५% वाटा निश्चित करण्यात आला होता.

मोफतराज मुनोत, पराग मुनोत हे कंपनीने प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओनंतर त्यांच्या भागभांडवलात १००% हून घट होत ८१.३% भागभांडवल पोहोचेल.

कंपनीला आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील मार्च तिमाहीत २०२९.८४ कोटींचा महसूल (Revenue) मिळाला होता तो डिसेंबर २०२४ पर्यंत घसरत १६९९.४९ कोटी झाला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) मध्ये मार्च २०२४ मधील ११६.५१ कोटींच्या तोट्यातील तुलनेत ५.५१ कोटींचा नफा मिळाला आहे. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (EBITDA) मध्ये मार्च २०२४ मधील ७८.०१ कोटी तोट्याच्या तुलनेत डिसेंबर २०२४ पर्यंत वाढ होत १०१.६७ कोटींचा नफा झाला होता.

कंपनीचे भागभांडवल (Market Capitalisation) ८५२४.०७ कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओतील मिळालेल्या निधीचा वापर जुनी थकबाकी चुकवण्यासाठी व दैनंदिन कामकाजासाठी होणार आहे. पहिल्या दिवशी केवळ ०.०३% आयपीओ सबस्क्राईब झाला होता ज्यामध्ये ०.१४ वेळा किरकोळ गुंतवणूकदारांचे व ०.०३% विना संस्थात्मक गुंतवणूकदारांचे सबस्क्रिप्शन कंपनीला मिळू शकले आहे. १९८८ मध्ये स्थापन झालेल्या कल्पतरू या रिअल इस्टेट कंपनीने मुंबई, ठाणे, पुणे, हैदराबाद आणि इतर शहरांमध्ये २५.९ दशलक्ष चौरस फूट पेक्षा जास्त क्षेत्र विकसित केले आहे. ते कल्पतरू ग्रुप अंतर्गत कार्यरत आहे, जे त्याच्या पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि ईपीसी कौशल्या मध्ये ते तज्ञ मानले जातात.

२) Ellenbarrie Industrial Gases Limited (EIGL) - एलेनबेरी इंडस्ट्रियल गॅसेस लिमिटेड कंपनीचा आयपीओ आजपासून दाखल होत आहे. आयपीओसाठी कंपनीने Price Band ३८० ते ४०० रूपये प्रति समभाग (Shares) निश्चित करण्यात आला होता. २४ ते २६ जून या कालावधीत आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. २७ जूनला आयपीओचे अंतिम वितरण (Allotment) होणार आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी ३७ समभाग विकत घ्यावे लागतील असे कंपनीने म्हटले आहे. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी ५०% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (Qualified Institutional Investors QIB) यांच्यासाठी,किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) यांच्यासाठी ३५% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदार (Non Institutional Investors NII) यांच्यासाठी १५% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. आज सकाळपासून ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा समभाग ७ रूपये प्रिमियम दराने (GMP) विकला जात आहे ज्याची किंमत अंदाजे ४०७ रूपये प्रति समभाग आहे.

पद्मकुमार अग्रवाल, वरूण अग्रवाल कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओनंतर त्यांच्या भागभांडवलात ९६.४७% वरून ८१.५९% घट होईल. कंपनीने यापूर्वीच अँकर गुंतवणूकदारांकडून २५५.७६ कोटी रुपये मिळवले आहेत. १९७३ साली कंपनीची स्थापना झाला होती ही कंपनी प्रामुख्याने औद्योगिक, मेडिकल, गॅसचे उत्पादन करते. कंपनी ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, एसिटिलीन, नायट्रोजन, हेलियम, हायड्रोजन, आर्गॉन आणि नायट्रस ऑक्साईडसारखे आवश्यक वायू सेवा कंपनी पुरवते. EIGL विविध उद्योगांना सेवा देणारे कोरडे बर्फ, कृत्रिम हवा, अग्निशामक वायू, वैद्यकीय ऑक्सिजन, द्रवीभूत पेट्रोलियम वायू (LPG), वेल्डिंग मिश्रण आणि विशेष वायू देखील देते.

यापूर्वी कंपनीला मार्च २०२४ मधील २९०.२० कोटींच्या तुलनेत महसूलात वाढ होत महसूल डिसेंबर २०२४ पर्यंत ३४८.४३ कोटींवर पोहोचला होता. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात मार्च २०२४ मधील ४५.२९ कोटींच्या तुलनेत वाढ होत डिसेंबर २०२४ पर्यंत नफा ८३.२९ कोटींवर गेला. कंपनीच्या करपूर्व नफ्यात मार्च ६१.५३ कोटींच्या तुलनेत वाढ होत डिसेंबर २०२४ तिमाहीपर्यंत १०९.७४ कोटींचा नफा झाला होता. कंपनीचे बाजार भांडवल ५६३७.४२ कोटी आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी भूतकाळातील देणी चुकवण्यासाठी, नवे युनिट सुरू करण्यासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी करणार आहे. कंपनीला सकाळपर्यंत आज एकूण ०.०४% सबस्क्रिप्शन प्राप्त झाले होते. त्यामध्ये पब्लिक फ्रेश इश्यूपैकी किरकोळ गुंतवणूकदारांनी ०.०६% वाटा सबस्क्राईब केला तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ०.०२ % वाटा सकाळपर्यंत सबस्क्राईब केला होता.

३) Globe Civil Projects Limited - ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने आजपासून आपला आयपीओ बाजारात दाखल केला आहे. २४ ते २६ जून काळात हा आयपीओ बाजारात उपलब्ध राहणार आहे. आयपीओसाठी Price Band ६७ ते ७१ रूपये प्रति समभाग निश्चित करण्यात आला होता. गुंतवणूकदारांना कमीत कमी २११ गठ्ठे (Lot) खरेदी करावे लागतील. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कमीत कमी १४१३७ रूपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. या आयपीओचे अंतिम वाटप २७ जूनला होणार आहे. कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये (GMP) १४0 रूपये प्रिमियम दराने विकला जात आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा आयपीओ ११९ कोटींचा आहे. हा निधी अथवा फ्रेश इश्यूचा माध्यमातून उभा केला जाईल MEFCOM Capital Markets Limited ही कंपनी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे तर Kfin Technologies Limited ही कंपनी या आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. या आयपीओतील एकूण गुंतवणूकीपैकी ५०% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांच्यासाठी तर, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) यांच्यासाठी ३५% वाटा, तर विना संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्यासाठी १५% वाटा निश्चित करण्यात आला होता. कंपनीने यापूर्वीच अँकर गुंतवणूकदार (Anchor Investors) ह्यांच्याकडून ३५.७० कोटींचा निधी उभारला आहे. बिडिंगसाठी २३ जून शेवटची तारीख होती.

वेद प्रकाश खुराना, निपूण खुराना, विपुल खुराना हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओनंतर त्यांच्या भागभांडवलात ८८.१४% वरून घसरत ६३.४३% वर पोहोचेल. २००२ साली स्थापित झालेली ही कंपनी इंटिग्रेटेड इंजिनिअरिं ग, प्रोकरमेंट (Procurement), कन्स्ट्रक्शन (ईपीसी) कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय दिल्लीत आहे. कंपनीने उत्तरप्रदेश, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश इत्यादी ठिकाणी कार्य विस्तार आहे.

कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४२४.०० कोटी रुपये आहे. मार्च २०२४ मधील ३३४.८१ कोटींच्या महसूलात घसरण होत महसूल २५६.७४ कोटींच्या घरात पोहोचला आहे. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात मार्च २०२४ म धील १५.३८ कोटींच्या तुलनेत डिसेंबर २४ मध्ये १७.७९ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. करपूर्व नफ्यात मार्च २०२४ मधील ४४.६५ कोटींच्या तुलनेत घसरण झाल्याने डिसेंबर २०२४ मधील करपूर्व नफा ३९.३० कोटींवर पोहोचला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर खेळत्या भांडवलासाठी (Working Capital) , भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure), दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. सकाळपर्यंत कंपनीच्या आयपीओला एकूण १.४९ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून २.१५ सबस्क्रिप्शन तर १.९६ पटीने सबस्क्रिप्शन विना संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीत कंपनीने मिळवले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >