अमावास्येच्या दिवशी ही कामे करताय सावधान ..!

मुंबई : अमावास्येच्या दिवशी जर तुम्ही काही कामे करत असाल तर सावधान ..! जर तुम्ही अमावास्येला काही काम करताना हे नियम पाळले नाहीत तर तुम्ही अडचणीत सापडाल .अमावास्येला काही कामे टाळावी ती का आणि कोणती चला पाहुया.


अमावास्येच्या दिवशी जर तुम्ही या गोष्टी टाळल्या तर तुमच्यावर सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम राहील आणि पितृ देव तुमच्यावर नाराज होणार नाहीत .


अमावास्येला जर तुम्ही मद्यपान करत असाल किंवा मांसाहार करत असाल तर ते करू नये कारण या पदार्थांचे सेवन केल्याने नकारात्मक ऊर्जा शरीरात निर्माण होतात आणि क्लेश होण्याचा धोका वाढू शकतो , त्यामुळे अमावस्येच्या दिवशी मद्य पिऊ नये तसेच मांसाहारही करू नये


अमावास्येच्या दिवशी झाडू खरेदी करू नये कारण त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करते .अमावस्येच्या दिवशी केस कापने, नख कापणे अशुभ मानले जाते. अमावास्येच्या दिवशी केस कापू नयेत हा एक पारंपरिक आणि धार्मिक समज आहे. यामागे काही धार्मिक, ज्योतिषशास्त्रीय आणि सामाजिक कारणं सांगितली जातात. अमावास्येच्या दिवशी पितरांची पूजा केली जाते. या दिवशी शरीरशुद्धता आणि संयम पाळावा असा सल्ला दिला जातो. केस कापणे, दाढी करणे हे शरीरावर संस्कार मानले जातात , त्यामुळे अमावस्येच्या दिवशी ही कामे टाळावी


अमावास्येला चंद्र दिसत नाही, आणि हिंदू धर्मात चंद्राला मनाचं प्रतीक मानलं जातं. चंद्राचा अभाव म्हणजे भावना, मनःशांती, स्थैर्य यांचा अभाव असतो . अमावास्या ही सामान्यतः "श्रद्धा" आणि "तपस्या" यासाठी उपयुक्त मानली जाते, पण शुभ कार्यासाठी नव्हे.म्हणून, या दिवशी लग्न, गृहप्रवेश, उत्सव, मंगलकार्य टाळणं उत्तम .महालया अमावास्या, सोमवती अमावास्या, आषाढी अमावास्या यासारख्या अमावास्या काही विशिष्ट पूजेसाठी पवित्र मानल्या जातात. म्हणजेच, सर्व अमावास्या अशुभ नसतात, परंतु सामान्यतः शुभ कार्य टाळावे .

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.