Gas Cylinder : इराण-इस्रायल युद्धाचा झटका थेट भारताच्या LPG सिलिंडरला बसणार!

भारतातील LPG पुरवठा कोलमडणार!


पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थितीचा थेट परिणाम आता तुमच्या घरातील किचनवर पडणार आहे.इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरू आहे. काल अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर आणखी तणाव वाढला आहे, या युद्धाचा परिणाम आता जगावर होणार आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक तीनपैकी दोन एलपीजी सिलिंडर पश्चिम आशियातून येतात. जर या प्रदेशात तणाव जास्त प्रमाणात वाढला आणि पुरवठा विस्कळीत झाला तर सर्वात पहिला सर्वसामान्यांना फटका बसणार आहे. यामुळे या युद्धाचा परिणाम आता भारतातल्या एलपीजी गॅसवरही होणार आहे. माहितीनुसार, सध्या देशात कमी प्रमाणात गॅसचा साठा शिल्लक आहे.



दुप्पट वापर


LPG सिलेंडर हा स्वयंपाकघरातील आवश्यक गरज ठरत आहे. गेल्या दशकभरात भारतात एलपीजीचा वापर जवळजवळ दुप्पट झाला आहे. ३३० दशलक्ष घरांपर्यंत सिलेंडर पोहोचला असून एलपीजी वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण आयात-निर्यात धोरणाकडे पाहता समजते की, भारताची आयातीवरील निर्भरता वाढली आहे, कारण सुमारे ६६% एलपीजी हा विदेशातून आयात केला जातो, ज्यापैकी ९५% पश्चिम आशियातून, मुख्यतः सौदी अरेबिया, यूएई आणि कतारमधून आयात होतो.



१६ दिवसांचा साठा शिल्लक


सध्या देशात कमी प्रमाणात गॅसचा साठा शिल्लक आहे. आयात टर्मिनल्स, रिफायनरीज आणि बॉटलिंग प्लांटमध्ये भारताची एलपीजी साठवण क्षमता राष्ट्रीय सरासरी वापराच्या फक्त १६ दिवसांसाठी पुरेशी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत देशाची स्थिती चांगली आहे. भारत दोन्हीचा निव्वळ निर्यातदार आहे. तो त्याच्या देशांतर्गत पेट्रोल वापराच्या सुमारे ४० टक्के आणि डिझेल वापराच्या सुमारे ३० टक्के निर्यात करतो. गरज पडल्यास हे निर्यात प्रमाण सहजपणे देशांतर्गत बाजारपेठेत वळवता येते. अमेरिका, युरोप, मलेशिया किंवा आफ्रिकेच्या काही भागांसारख्या पर्यायी स्रोतांमधूनही एलपीजी आयात करता येते, पण या देशांमधून भारतात माल पोहोचण्यास जास्त वेळ लागेल. दुसरीकडे, पाईपद्वारे नैसर्गिक वायू फक्त १.५ कोटी भारतीय घरांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे, देशातील ३३ कोटी एलपीजी कनेक्शनसाठी हा एक पर्याय नाही.



पेट्रोल-डिझेलमध्ये चांगली स्थिती


पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत देशाची स्थिती खूपच चांगली आहे. भारत दोन्हीचा निव्वळ निर्यातदार आहे. तो त्याच्या देशांतर्गत पेट्रोल वापराच्या सुमारे ४०% आणि डिझेल वापराच्या सुमारे ३०% निर्यात करतो. गरज पडल्यास या निर्यातीचे प्रमाण सहजपणे देशांतर्गत बाजारपेठेत वळवता येते.




वीज एकमेव पर्याय


बहुतांश ठिकाणी सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे रॉकेलचा पुरवठा बंद झाला आहे. आता जर शहरांमध्ये एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला, तर विजेवर स्वयंपाक करणे हा एकच पर्याय उरतो.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल