Saturday, October 25, 2025
Happy Diwali

मंत्री नितेश राणे यांनी केली वर्सोवा जेट्टीची पाहणी

मंत्री नितेश राणे यांनी केली  वर्सोवा जेट्टीची पाहणी

स्थानिक मासेमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी नितेश राणे यांची सकारात्मक भूमिका

मुंबई : मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अंधेरी येथील वर्सोवा मच्छीमार जेट्टीची पाहणी करून विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी मत्स्य आयुक्त किशोर तावडे, भाजपा मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हाध्यक्ष ग्यानमूर्ती शर्मा, राजश्री भानजी, चारुल भानजी, राजहंस टपके, जयराज चंदी, शारदा पाटील, पराग भावे आदी उपस्थित होते.

वर्सोवा जेट्टीसंदर्भात आराखडा तयार असून त्यानुसार लवकरच जेट्टीचा विकास करण्यात येईल. स्थानिक मच्छीमार बांधवांच्या समस्यांसंदर्भात प्रस्ताव आमच्याकडे द्या. त्यानुसार समस्या मार्गी लावल्या जातील, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिली. मंत्री नितेश राणे यांनी स्थानिक कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन सकारात्मक चर्चा केली. मासळी बाजारासाठी शेड व बंद शीतगृह सुरू करण्याच्या मच्छीमार बांधवांच्या मागणीची दखल घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिले.

Comments
Add Comment