इराणचे जोरदार प्रत्युत्तर, कतारच्या दोहामध्ये अमेरिकेच्या तळांवर हल्ला, ६ मिसाईल्स डागली

तेहरान: इराणने कतार स्थित अमेरिकेच्या तळांवर ६ मिसाईल्स डागली हेत. इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा हवाला दिला आहे. हा हल्ला म्हणजे अमेरिकेला इराणने दिलेले प्रत्युत्तर असल्याचे मानले जात आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात सातत्याने तणाव वाढत आहे. खासकरून अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रावर हल्ला केल्यानंतर हा तणाव अधिक वाढला आहे.



अमेरिकेच्या लष्कर तळांवर ६ मिसाईल्सने केला हल्ला


इराण-इस्त्रायल यांच्यातील तणाव वेगाने वाढत आहे. एकीकडे इस्त्रायल आणि इराण यांच्यातील भीषण युद्ध सुरूच आहे तर दुसरीकडे आता इराण आणि अमेरिकाही आमनेसामने आहेत. इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणने कतारमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर ६ मिसाईल्सने हल्ला केला. याआधी रविवारी सकाळी अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रांना लक्ष्य केले होते.


 


अनेक रिपोर्ट्समध्ये दिला होता इशारा


काही रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की इराणने अमेरिकेच्या ठिकाणांवर संभाव्य हल्ल्यासाठी अनेक मिसाईल लाँचर तैनात केले आहेत. तर सोमवारी दुपारपासूनच कतारमध्ये अमेरिकेच्या सर्वात मोठे सैन्य तळ अल उदीद एअरबेसवर हल्ल्याचा धोका होता.
Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त