Mumbai Film City Fire : गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग, अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक

मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरातील फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागली आहे. सकाळी ६.३०च्या सुमारास फिल्म सिटीतील अनुपमा या मालिकेच्या सेटवर ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.





रविवारी अनुपमाच्या सेटवर शूटिंग बंद होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग विझल्यानंतर याबाबत अधिक तपास आरे पोलीस करतील.



३ महिन्यांपूर्वी फिल्मसिटीच्या शेजारील घरांमध्ये आग


३ महिन्यांपूर्वी फिल्मसिटीच्या शेजारी नागरमोडी पाड्यात आंबेवाडी परिसरात भीषण आग लागली होती. संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नागरमोडी पाड्यात असलेल्या आंबेवाडीचा झोपडपट्टीमध्ये ही मोठी आग लागली होती. आगीच्या माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. घरात सिलेंडर गॅसचे विस्फोट झाल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली होती. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाले नाही पण मोठ्या प्रमाणात घरं जळून खाक झाली होती.


Comments
Add Comment

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत

लोकलच्या दारात उभे राहणे म्हणजे निष्काळजीपणा नव्हे; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : स्वप्नांची दुनिया आणि मायानगरी असलेल्या मुंबईत प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करायला येत असतो. आणि बघता

आयआयटी बॉम्बेकडून भारतासाठी ‘स्वदेशी एआय’ची तयारी

भारतीय भाषांसाठी नव्या तंत्रज्ञान युगाची सुरुवात मुंबई : देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल

भोसरी भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे यांना दणका

दोषमुक्तीबाबतचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला मुंबई : एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना आपल्या पदाचा

कस्तुरबा रुग्णालयातील बर्न्स केअर कक्षाची होणार सुधारणा

आयसीयूसह सर्वसाधारण खाटांची जागा सुसज्ज मुंबई : संसर्गजन्य रोगाच्या आजारांसाठी असलेल्या कस्तुरबा

जुनी शालेय इमारत पाडताना पोर्टेबल पर्यायी शाळा आसपासच सुरु करणार

पुनर्विकास करण्यात येणाऱ्या शालेय इमारतींसाठी महापालिकेने उचलले असे पाऊल मुंबई : माहिममधील महापालिका शाळा