
मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरातील फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागली आहे. सकाळी ६.३०च्या सुमारास फिल्म सिटीतील अनुपमा या मालिकेच्या सेटवर ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईमधील गोरेगाव फिल्मसिटीतील 'अनुपमा' मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दल तात्काळ दाखल झाले.
.
.#goregoan #filmcity #fire #FireNews #filmcityfire… pic.twitter.com/it7MT8AbyL
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) June 23, 2025
रविवारी अनुपमाच्या सेटवर शूटिंग बंद होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग विझल्यानंतर याबाबत अधिक तपास आरे पोलीस करतील.

प्रकाश जनार्दन गोगटे देवगड महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, जहाल आणि जाज्वल्य हिंदुत्ववादी ...
३ महिन्यांपूर्वी फिल्मसिटीच्या शेजारील घरांमध्ये आग
३ महिन्यांपूर्वी फिल्मसिटीच्या शेजारी नागरमोडी पाड्यात आंबेवाडी परिसरात भीषण आग लागली होती. संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नागरमोडी पाड्यात असलेल्या आंबेवाडीचा झोपडपट्टीमध्ये ही मोठी आग लागली होती. आगीच्या माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. घरात सिलेंडर गॅसचे विस्फोट झाल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली होती. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाले नाही पण मोठ्या प्रमाणात घरं जळून खाक झाली होती.