ENG vs IND : टीम इंडियाचे इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान

  113

लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर होत आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. भारताने या सामन्यातील दुसऱ्या डावात ३६४ धावा केल्या. यासोबतच भारताने कसोटीत विजयासाठी इंग्लंडसमोर ३७१ धावांचे आव्हान ठेवले आहे.


दुसऱ्या डावात भारताने केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांच्या शतकी खेळाच्या जोरावर साडेतीनशे पार धावा केल्या. सलामीवीर केएल राहुलने १३७ धावा तडकावल्या. त्याने २४७ बॉलमध्ये १८ चौकार ठोकत १३७ धावा केल्या. साई सुदर्शनने ३० धावा केल्या. ऋषभ पंतने पहिल्या डावा प्रमाणेच दुसऱ्या डावातही शतक ठोकले. त्याने १४० बॉलमध्ये ११८ धावा ठोकल्या. बाकी इतर कोणत्याही फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. ३४९ धावांवर भारताने तीन गडी गमावले. लोकेश राहुलची विकेट पडल्यानंतर भारताचा डाव सावरूच शकला नाही.


या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारावर टीम इंडियाला केवळ ६ धावांची आघाडी मिळाली होती.

Comments
Add Comment

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणार?

चेन्नईकडून खेळण्याची शक्यता, अश्विनही संघातून बाहेर पडण्याच्या विचारात चेन्नई  : संजू सॅमसनने राजस्थान

'या' पाकिस्तानी क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपात ब्रिटनमध्ये अटक

नवी दिल्ली: पाकिस्तानचा २४ वर्षीय क्रिकेटर हैदर अलीला बलात्कार प्रकरणात ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे.

आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी