Crude Oil News: आपल्याकडे तेल मुबलक प्रमाणात चिंतेचे कारण नाही - हरदीप सिंह पुरी

  57

प्रतिनिधी: जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीकडे चाहूल लागताच त्यांचे पडसाद सगळ्या क्षेत्रात उमटू लागले आहेत. विशेषतः कच्चे तेल (Crude Oil) निर्देशांकात सकाळी १ ते २% वाढ झाल्याने तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंतेचे वातावरण होते. विशेषतः इराणने तेल पुरवठा बंद करण्याची धमकी दिली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय तेल मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मोठे विधान केले आहे. 'जगातील सर्वात मोठ्या उर्जा पुरवठा क्षेत्रांमध्ये (मध्यपूर्वेतील) तणावाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही चिंता करण्याचे कारण नाही कारण आपल्याकडे पुढील अनेक आठवडे चालेल इतके पुरेसे इंधन उपलब्ध आहे' असे विधान केले आहे. या विधानाने नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.


हरदीप सिंह पुरी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून ' आम्ही गेल्या दोन आठवड्यात मध्यपूर्वेतील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत ' असे संकेत दिले होते. यापुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की,' पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांच्या नेतृत्वा खाली आम्ही गेल्या काही वर्षांत तेलाचा पुरवठा मार्गच वळवला आहे. त्यामुळे आता तेलाचा पुरवठा थेट स्ट्रेट ऑफ होरमूझ' येथून होत नाही.याशिवाय व्यक्त होताना पुरी म्हणाले, 'आमच्या तेल विपणन (Oil Marketing) कंपन्यांकडे अनेक आठवड्यांचा पुरवठा असतो आणि त्यांना अनेक मार्गांनी ऊर्जा पुरवठा मिळत राहतो. आमच्या नागरिकांना इंधन पुरवठा स्थिर राहावा यासाठी आम्ही सर्व आवश्यक पावले उचलू ' असे म्हटले.


प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रेट ऑफ होरमूझ एक आठवड्याहून अधिक वेळ बंद राहिल्यास तेल बाजारात मोठा व्यत्यय येऊन तेलाच्या किंमती भरमसाठ वाढू शकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात तेलाच्या किंमती स्थिर होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. तसेच सुत्रांच्या माहितीनुसार, देशभरात तेलाच्या किंमतीत आटोक्यात ठेवण्यासाठी सरकार एक्ससाईज ड्युटीत देखील कपात करू शकते.


भारत जवळपास आपल्या गरजेच्या ८५% अधिक तेल आयात करतो. ज्यामध्ये नैसर्गिक तेलाचा अर्धा हिस्सा समावेश आहे. त्यातील अर्धा गॅस मध्यपूर्वेतून येतो तर ४०% हून अधिक तेलाची आयात मध्यपूर्वेतूनच होते. पेट्रोल व डिझेल रिफायनरीमध्ये लागणारे कच्चे तेल आपल्या देशात रशियाकडून येते. पारंपरिक व्यापारात रशिया स्वस्त दरात तेल देत असल्याने भारत त्यांचा मोठा ग्राहक आहे. सध्या ७७ डॉलर्सहून अधिक पातळी प्रति बॅरेलने गाठली असल्याने भारतीय बाजारात तेलाबाबत चिंता कायम दिसत आहे.

Comments
Add Comment

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या