Bank of Baroda Capex: भांडवली खर्चात उत्तरप्रदेश व गुजरातचा पहिला नंबर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर! ' इतक्या ' टक्क्याने देशात भांडवली खर्चात वाढ

प्रतिनिधी: भांडवली खर्च (Capital Expenditure Capex) खर्च करण्यात युपी व गुजरातने बाजी मारली असल्याचे बँक ऑफ बडोदाने आपल्या अहवालात म्हटले आहे. राज्य सरकार आपल्या राजांच्या विकासाकरिता व मूलभूत सुविधा (Infrastructure) यांसाठी खर्च करत असलेल्या भांडवली खर्चात युपी, गुजरातने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यानंतर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक यांचा नंबर लागतो असे बँकेने म्हटले. रिपोर्टमधील माहितीनुसार, देशस्तरावर आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील एकूण खर्चाच्या ५०% हून अधिक भांडवली गुंतवणूकीत या राज्यांचा क्रमांक लागतो. त्यांमध्ये उत्तरप्रदेश, गुजरातचा क्रमांक आहे त्यानंतर महाराष्ट्र व मध्यप्रदेशचा क्रमांक लागतो.'

कॅपिटल आउटलेमध्ये या पाचही राज्यांनी वाढ केल्याचे अहवालात म्हटले आहे. कॅपिटल आऊटले (Capital Outlay) म्हणजे राज्य सरकार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी खर्च करत असते. उदाहरणार्थ इमारत बांधणे, रस्ते बांधणे, शाळा इस्पितळ,विविध केंद्र उभारणे अशा सुविधांसाठी सरकार आपल्या बजेटमधील भांडवली खर्चात वाढ करत असते.

अहवालातील माहितीनुसार, एकूण २६ राज्यांचा भांडवली खर्च ८.७ लाख कोटी रुपये आहे ज्यामध्ये २६ राज्यांपैकी गुजरात (९.४%), महाराष्ट्र (८.३%), मध्यप्रदेश (८.१%), कर्नाटक (६.७%) यांचा समावेश आहे तर सर्वाधिक भांडवली खर्च उत्तर प्रदेश (१६.९%) आहे. मागील आर्थिक वर्षात सर्वाधिक भांडवली खर्च उत्तर प्रदेश (१६.९%), महाराष्ट्र (१०.९%), गुजरात (८.१%), मध्यप्रदेश (७.५%), ओडिशा (६.४%) यांचा समावेश होता.अहवालातील माहितीनुसार या वर्षीच्या ८.७ लाख कोटी तुलनेत पुढील आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये भांडवली खर्च हा १०.२ लाख कोटींपर्यंत जाऊ शकतो. अहवालानुसार सर्वाधिक कमी भांडवली खर्च नागालँड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांनी केला. या राज्यांचा एकूण भांडवली खर्च देशाच्या भांडवली खर्चातील तुलनेत केवळ ०.४% आहे.

याखेरीज अहवालात म्हटल्याप्रमाणे, २६ राज्य आर्थिक वर्ष २०२६-२७ पर्यंत ६९.४ लाख कोटीवर पोहोचू शकतात. असे झाल्यास इयर ऑन इयर बेसिसवर १०% वाढ भांडवली खर्चात होऊ शकते. याशिवाय राजाच्या महसूलातही १२.३% वाढ होऊ शकते असा अंदाज अहवालात व्यक्त केला गेला आहे.

सर्वाधिक महसूल उत्तर प्रदेश (१३.३%), महाराष्ट्र (११.३%), मध्यप्रदेश (५.९%), राजस्थान (५.९%), कर्नाटक (५.९%) या राज्यांना प्राप्त झाला आहे. महत्वाचे म्हणजे वृत्तानुसार, ही राज्ये आगामी काळात वित्तीय तूटीत नियंत्रण पातळीवरच राहू शकतात. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने आपले लक्ष व आपला अर्थसंकल्प हा भांडवली खर्चासाठी वापरण्याचे ठरवलेले यावरून स्पष्टपणे जाणवत आहे.
Comments
Add Comment

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर ; म्हणून न्यायालयाने पुढे ढकलली सुनावणी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

'तरूणांसाठी' पोकोचा नवा C85 5G स्मार्टफोन बाजारात लॉच

मुंबई: व्हॅल्यू फॉर मनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोको (POCO) ब्रँड हा तरुणाईला नेहमीच भावतो. अशातच कंपनीने आपल्या

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात

काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण, महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा