Anil Ambani: अनिल अंबानी यांची गाडी सुसाट! सलग तिसऱ्यांदा २७३ कोटींची व्याजासह परतफेड, शेअर्स ३% उसळला

प्रतिनिधी: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने डसॉल्ट एव्हिएनशी हातमिळवणी करत नागपूरमध्ये फाल्कन बिझनेस जेट सुरू करण्याची घोषणा केली आहे.पॅरिस एअर शो येथे ही अधिकृत घोषणा गुरूवारी करण्यात आली. त्याच धर्तीवर अनिल अंबानी यांना आणखी एक यश मिळाले आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने २७३ कोटींचे कर्ज व्याजासगट फेडले आहे अशी घोषणा केली. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरंची उपकंपनी जेआरटोल रोड (JR Toll Road) या कंपनीने येस बँकेला ही परतफेड केली आहे अशी घोषणा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने केली.

आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये कंपनीने आपल्या JRTR कंपनीसह हमीदाराची (Guarantor) ची भूमिका पार पाडली आहे. आणि कंपनीने सगळे थकीत कर्ज व्याजासह चुकवले असल्याचे म्हटले आहे. गेले काही वर्ष अनिल अंबानी यां च्या रिलायन्स समुहाची आर्थिक घसरण सुरू होती. मात्र यावर्षी त्यांनी जोरदार पुनरागमन करत कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे.

रिलायन्सने आपल्या विशेषतः थकीत देणी चुकवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की येस बँक (Yes Bank) चे कुठल्याही प्रकारचे भागभांडवल (हिस्सा) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नाही. यापूर्वी २० २४ मध्येही अनिल अंबानी यांनी आपली थकीत देणी चुकवण्यासाठी रेग्युलेटरी फायलिंग केले होते.

ही बातमी आल्यानंतर आज दुपारपर्यंत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या समभागात (Shares) मध्ये २.१३% वाढ झाली आहे. सकाळी शेअर्समध्ये ३ ते ३.५०% वाढ झालेली पहायला मिळत होती. याआधी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आपल्या Rosa Power Supply Company (४८५ कोटी), रिलायन्स पॉवर (३८७२कोटी) कर्ज चुकते केले होते. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने जे आर टोल रोड कंपनी ही राष्ट्रीय महामार्ग ११ वरील ५२ किलोमीटर लांबीच्या देखभालीसाठी व विकासासा ठी जबाबदारी घेते. या प्रकल्पारता ही कंपनी स्थापन करण्यात आली होती.

नेमके रेग्युलेटरी फायलिंगमध्ये कंपनीने काय म्हटले आहे ?

२६ नोव्हेंबर २०२४ आणि १ एप्रिल २०२५ रोजीच्या आमच्या खुलाशांच्या आधारे आणि लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ३० नुसार, आम्ही येथे कळवत आहोत की कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या जेआर टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड (जेआरटीआर) ने (कंपनी कॉर्पोरेट गॅरंटर म्हणून) आज येस बँक लिमिटेड (वायबीएल) सोबत सेटलमेंट करारात एक परिशिष्ट (Addendum) केला ज्यासाठी जेआरटीआरने वायबीएलला देय असलेले सुमारे रुपये २७३ कोटी व्याजासह संपू र्ण थकित कर्ज दायित्व आहे आणि त्यांनी योग्यरित्या पैसे दिले आहेत.'
Comments
Add Comment

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण