बीड : मस्साजोग संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मागील काही महिन्यांपासून बीडच्या तुरुंगात आहे. कराडवर मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. शनिवारी वाल्मिक कराड याची प्रकृती अचानकपणे बिघडली. यापूर्वी देखील तुरुंगता असताना वाल्मिक कराड याने प्रकृती ठिक नसल्याचे सांगून अनेक कारणे दिली होती. शनिवारी वाल्मिक कराडची तब्येत ठिक नसल्याने वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली होती.
वैद्यकीय पथकाच्या माहितीनुसार वाल्मिक कराड याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे वैद्यकीय पथकाने अॅडमीड नकरता त्याच्यावर उपचार केले. यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे कराड याला ऑक्सिजन लावण्यात आला होता. वाल्मिक कराड याला यापूर्वी अनेकदा मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
जेल प्रशासनाने तातडीने वैद्यकीय पथकाला याबाबत माहिती दिली. वैद्यकीय पथकाने कारागृहात जाऊन त्याची तपासणी केली, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. परंतू वाल्मिक कराड याला श्वासाचा आजार असल्यामुळे त्याच्या विपरीत परिणाम आरोग्यावर झाला नाही. असे वैद्यकीय पथकाने सांगितले. त्यामुळे वैद्यकीय पथकाच्या अहवालानुसार कराडच्या प्रकृतीत किती फायदा होणार आहे ते देखील पाहवं लागणार आहे.