Friday, October 24, 2025
Happy Diwali

आगामी वर्ल्डकप खेळणे विराट आणि रोहितसाठी सोपे नसेल: गांगुली

आगामी वर्ल्डकप खेळणे विराट आणि रोहितसाठी सोपे नसेल: गांगुली

कोलकाता : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या दोघांचंही लक्ष्य हे २०२७ चा क्रिकेट विश्वचषकावर आहे. मात्र, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना तंदुरुस्त राहणे आणि २०२७ मध्ये भारताच्या एकदिवसीय विश्वचषक संघात स्थान मिळवणे सोपे नसेल असे माजी कर्णधार सौरव गांगुली म्हटले आहे.

"आपल्या सर्वांना हे समजून घेतले पाहिजे की, सर्वांप्रमाणेच, खेळ त्यांच्यापासून दूर जाईल आणि ते खेळापासून दूर जातील," असे गांगुलीने त्याच्या निवासस्थानी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.

पुढील एकदिवसीय विश्वचषक हा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे. आयसीसीची ही स्पर्धा खेळली जाईल तेव्हा कोहली ३८ वर्षांचा असेल आणि रोहित ४० वर्षांचा असेल. त्यामुळेच त्यांना भारतीय संघात स्थान मिळवणे कठीण जाणार असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >