मुंबई हादरली ! महिला पायलटसोबत चालत्या कॅबमध्ये विनयभंग, पोलिसांना पाहताच आरोपी पळाले.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत धक्कादायक घटना घडली. फोर्ट-घाटकोपर प्रवासादरम्यान एका २८ वर्षीय पायलट महिलेचा (female pilot) विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला. महिलेने कॅब बुक केल्यानंतर चालकाने रस्ता बदलून गाडीत दोन अज्ञात व्यक्तींना बसवलं आणि त्या दोघांनी महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची नाकाबंदी पाहून आरोपी पळून गेले. याप्रकरणी आरोपी कारचालकासह त्याच्या दोन सहकार्‍यांविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी विनयभंगासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पळून गेलेल्या या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पीडित महिलेचा पती नौदलात कार्यरत आहे सदरची महिला पतीला भेटण्यासाठी सीएसएमटी परिसरात आली होती. भेट झाल्यानंतर त्यांनी एकत्र जेवण केलं, आणि त्यानंतर महिलेने घरी जाण्यासाठी कॅब बुक केली.  काही अंतर पार केल्यानंतर कॅब चालकाने रस्ता बदलला.

चालकाने गाडी थांबवल्यावर दोन अज्ञात व्यक्ती कॅबमध्ये बसले.  त्यानंतर महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.  काही अंतरावरच पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. पोलिसांना पाहताच  आरोपी पळून गेले. घाबरलेल्या महिला पायलटने आपल्या पतीला झालेली घटना सांगितली. आणि त्यानंतर पीडित महिला आणि तीचा पती घाटकोपर पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंद केला.  घाटकोपर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

 

 
Comments
Add Comment

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत

मुंबई : आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर

भीम यूपीआयद्वारे 'मुंबई वन' तिकिटांवर २० टक्के सवलत

एमएमआरडीएकडून ३१ डिसेंबरपर्यंत ऑफर मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यांच्या

आज मध्यरात्री कल्याण-बदलापूर दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री कल्याण आणि बदलापूर दरम्यान चार ठिकाणी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

पाण्याची गळती आणि दुषित पाणी समस्येवर लक्ष द्या, आयुक्तांचे जल अभियंता विभागाला निर्देश

मुंबई : मुंबई उत्तर मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबत महापालिका आयुक्तांसोबतच लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या

भारताच्या फिरकी गोलंदाजांनी 'कांगारुं'चा उडवला धुव्वा!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे पारडे जड ; मालिकेत २-१ ने आघाडी; वॉशिंग्टनच्या फिरकीची जादूने ८ चेंडूत ३ बाद कॅरारा :

गोराईत उभारले जाणार भारतातील पहिले मॅग्रोव्ह पार्क

उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने साकारणार प्रकल्प मुंबई : भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम