पुढे चला...

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर


आपल्याला प्रवासाला घेऊन जाणारी आगगाडी पुढे पुढे जात असते, पळत असते आणि चालताना, पडताना जणू आपल्याला सांगत असते, ‘‘चला, पुढे चला, पुढे चला”. वाहती नदी “पुढे जा, पुढे जा” असा संदेश आपल्याला जणू देत असते. तिचा प्रवाह पुढे पुढे झेपावतो म्हणून तर आपण तिला नदी म्हणून ओळखतो. इंग्लिशमध्ये River नावाची कविता आहे. ती नदी म्हणते, “Men may come and men may go but I go on for ever”


कुणी येवो किंवा जावो मी आपली पुढे-पुढेच जात राहते. हे नदीचे सांगणे आपल्याला पटते कारण ती “आधी केले आणि मग सांगितले” याची प्रचिती देते म्हणूनच ना! कवी सुद्धा आपल्याला हेच सांगत असतात - ‘‘चल चल रे नौजवान, रुक ना तेरा काम नहीं चलना तेरी शान, “सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे,” “ए साथी तू बढता चल, तू चलता चल, उन्नती के अभियान पर तू चलता चल”, “गळ्यामधी पडलं तुझ्या माळ विजयाची, तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कुणाची? पर्वा बी कशाची? वारा वाहतो आणि आपल्यालाही “पुढे चला” असे सांगतो, पक्षी भरारी मारतो आणि आपल्या आचरणाने जणू आपल्यालाही “पुढे झेप घ्या” असं सुचवतो.


समजा मुलांना विचारलं वर्गात अक्षर कुणाचं चांगलं आहे? की मुलं स्वतः मागे राहून दुसऱ्याला पुढे करतात आणि दुसऱ्याकडे बोट दाखवतात. काम सांगितलं की, आपण पळ काढून दुसऱ्याला कामासाठी पुढे हो म्हणतात! हे असं का? उत्तर आहे, तुम्हाला मागे राहायची खोड लागली आहे. अंगात नको इतका आळस मुरला आहे. मग तुम्ही स्वतः कसे पुढे होण्यास धजावाल बरं?


सामान्य माणसं छोट्या छोट्या गोष्टींनी खचतात. अपयशाच्या कल्पनेने निराश होतात. हात-पाय गळतात. पण ज्याला यश मिळवायची तीव्र आकांक्षा, ओढ असते त्याच्याजवळ दृढ निर्धार असतो, दुर्दम्य आशावाद असतो, परिश्रमाची तयारी असते, प्रबळ इच्छाशक्ती असते, संकटांना हसतमुखाने सामोरे जाऊन समर्थपणे तोंड देण्याचे धैर्य असते. सर्वांवर मात कर आणि सतत पुढे, पुढे चालत राहा हाच यशाचा कानमंत्र होय.


“उत्कट भव्य ते घ्यावे, मिळमिळीत अवघे सोडावे” हे ध्यानात घेतले तरच आपला आत्मविश्वास दुणावतो, जिद्द सहस्त्रगुणीत होते आणि मग आपण ध्येयपूर्तीसाठी सतत पुढेच चालत राहतो. परिस्थितीवर, प्रतिकूलतेवर मात करू शकतो. ‘थांबला तो संपला’ किंवा “चलता रहे शाश्वत उसी की सफलता अभिराम है, चलना हमारा काम है”


“पुढे चला”- ही केवळ दोन शब्दांची घोषणा नाही, तर ती एक विचारधारा आहे. ही एक प्रेरणा आहे जी माणसाला अपयश, अडथळे, भीती, निराशा यावर मात करून सतत प्रगतीकडे वाटचाल करण्याची शिकवण देते.


१. स्वतःवर विश्वास ठेवा :
“पुढे चला” हे सांगते की, आपण कुठेही असलो तरी तिथेच थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढील पायरी गाठा. प्रत्येक नवीन दिवस ही एक संधी आहे.


२. अडचणींचा सामना करा :
जीवनात संकटं येतातच, पण त्याचं उत्तर म्हणजे थांबणं नाही, तर चालत राहणं आहे. “पुढे चला” म्हणजे अडचणींवर मात करत
प्रगती साधणे.


३. स्वप्न आणि उद्दिष्ट :
आपली स्वप्नं पूर्ण करायची असतील, तर थांबता कामा नये. “पुढे चला” हा मंत्र आपल्या मनात रुजवला, तर यश हमखास मिळतं.


४. महापुरुषांचा आदर्श :
महात्मा गांधीजींनी “चलो, आगे बढ़ो” असं सांगून देशाला स्वातंत्र्याच्या दिशेने नेलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेऊन समाज उन्नतीचा मंत्र दिला - तोही “पुढे चला” चाच एक भाग होता.


“पुढे चला” हे केवळ घोषवाक्य नाही, तर ते जीवनाचं तत्त्व आहे. जे यशस्वी होतात, ते मागे वळून न पाहता, प्रयत्नांची शर्थ करतात. आपणही असा निर्धार करूया - कधीही थांबायचं नाही, हार मानायची नाही... फक्त पुढे चालायचं!

Comments
Add Comment

अष्टमी: अंतर्मनाचा आरसा

कुठलाही धर्म असो…, कुठलाही पंथ असो… प्रत्येकाने शेवटी सत्, सुंदर आणि अहिंसेचीच शिकवण दिली आहे. कुणी कुर्निसात

प्रश्न आणि उत्तर!

प्रल्हाद जाधव दुपारची निवांत वेळ होती. घरात बसूनच होतो. एक छानसा लेख लिहावा असे मनात आले. पण कोणत्या विषयावर

थोर स्वातंत्र्यसैनिक काकासाहेब कालेलकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर, ऊर्फ काकासाहेब कालेलकर हे थोर स्वातंत्र्यसैनिक,

तुम्ही मुलांना घाबरताय का?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू नएजर्सच्यां मॅन्युप्युलेटिव्ह वागण्याने तुम्ही घाबरून गेला आहात का? मुलांवर

‘मेरे खयालोके आंगनमें...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी दोनच सिनेमात एकत्र काम केले. ‘आनंद’(१९७१) आणि

आदिशक्ती जगन्माता

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर सध्या नवरात्री सुरू आहे. आदिशक्ती जगन्मातेचा उत्सव सुरू आहे. देवीच्या वेगवेगळ्या