मानवंदना अरण्यऋषींना

सृष्टीत रमला
वृक्ष वल्लरीत
सर्व काळ त्यांसी
अभ्यासण्या l

वनश्री व्यासंगी
प्राणी पक्षी मित्र
अरण्यची गोत्र
सांगतसे l

व्यक्ती फार थोर
व्यग्र वनी फार
ज्ञानाचा सागर
अभ्यासक l

बारीक सारीक
तपशील ज्ञात
फिरती वनात
अनवाणी l

पक्ष्यांचे कुजन
घेतसे ऐकून
भावार्थ सांगून
तोषवितो l

वन निरीक्षण
हाची छंद फार
जीवनाचे सार
आरण्यसे l

मान वंदना ही
अर्पितो तुजला
ज्ञान हे जगाला
दिधले त्वा l

ऋषित्व जीवन
कल्याणा कारण
वने तुजलागी
आठविती


- प्रवीण पांडे, अकोला

Comments
Add Comment

डाकिया डाक लाया...

डॉ. साधना कुलकर्णी पत्रव्यवहार हा अनेकांच्या हृदयातला एक हळवा, नाजूक आणि भावनाप्रधान असा कोपरा असतो. आजही

कविवर्य मंगेश पाडगावकर

कोकणी बाणा : सतीश पाटणकर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव आदराने घेतले

सामाजिक एकाकीपणा आणि आधुनिक समाज

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजच्या धावपळीच्या युगात, जेव्हा आपण इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडलेलो आहोत, त्याच वेळी

‘विकत घेतला शाम...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सुमारे ६५ वर्षांपूर्वी आलेला एक सिनेमा आजही अनेकांच्या लक्षात आहे. राजाभाऊ

श्रीहरीचा अंश असलेल्या पृथूची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ध्रुवानंतर आठव्या पिढीत अंग नावाचा राजा झाला. त्याच्या पत्नीचे नाव सुनिथा

श्री गणेशाचे स्वरूप

अष्टसिद्धी विनायक तेजोमय चैतन्यरूप  ऊर्जेचा स्रोत अद्भुत ओंकार हे स्वरूप  वरील चार ओळींमधून मी गणेशाचे स्वरूप