लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या लीड्स कसोटीचा तिसरा दिवस भारताच्या नावावर राहिला. पहिल्यांदा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर रोखला आणि ६ धावांनी आघाडी घेतली. यानंतर भारताने तिसऱ्या दिवशी २ बाद ९० धावा केल्या आहेत. यशस्वी जायसवाल ४ आणि साई सुदर्शन ३० धावा करून बाद झाले.
भारतीय संघाने शुभमन गिल, ऋषभ पंत आणि यशस्वी जायसवाल यांच्या शतकांच्या मदतीने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या होत्या. याचे प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला.
भारताचा दुसरा डाव आतापर्यंत
पहिल्या डावातील ६ धावांच्या आघाडीनंतर केएल राहुल आणि यशस्वीची जोडी मैदानावर पोहोचली. मात्र टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाची सुरूवात चांगली राहिली नाही. १६ धावांवर भारताला पहिला झटका बसला. सलामीवीर यशस्वी जायसवाल ४ धावा करून बाद झाला. यानंतर साई सुदर्शन आणि केएल राहुल यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोघांनी ६५हून अधिक धावा केल्या. मात्र साई सुदर्शन ३० धावा करून बाद झाला. मात्र दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ९६ धावांची आघाडी घेतली होती. केएल राहुल ४७ तर शुभमन ६ धावांवर खेळत आहेत.