तेहरान: इराण आणि इस्त्रायल यांच्या युद्धात आता अमेरिकाही सामील झाली आहे. अमेरकेने इराणच्या तीन अणुकेंद्रे, फोर्डो, नतांज आणि इस्फाहन येथे हवाई हल्ले केले. हा हल्ला पूर्णपणे यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले, सर्व अमेरिकन विमाने आता इराणच्या हवाई सीमेच्या बाहेर पडली आहेत आणि सुरक्षित घरी परतत आहेत. आम्ही सर्वाधिक हल्ले फोर्डो नावाच्या साईटवर केले.
आमच्या महान योद्धांचे अभिनंदन, जगातील कोणतेही सैन्य असे करू शकत नाही. सोबतच आता शांतीची वेळ आहे. दरम्यान, इराणकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
अमेरिका करत आहे इस्त्रायलची मदत?
अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रावर हल्ला केला तर खुद्द इराणने सरळ युद्धात आणले आहे. हे पाऊल इस्त्रायलची मदत म्हणून पाहिले जात आहे. इराणच्या अणुकार्यक्रमांना संपवायचे आहे.