
मुंबई : पंढरपूर येथील आषाढी एकादशी उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने उधना आणि मिरज दरम्यान दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक ०९०७९ उधना-मिरज स्पेशल ही गाडी शुक्रवार, ०४ जुलै रोजी सकाळी ११:२५ वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मिरजला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०८० मिरज-उधना विशेष गाडी शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ४ वाजता उधना येथे पोहोचेल.
ही गाडी बारडोली,व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. ट्रेन क्रमांक ०९०८१ उधना-मिरज स्पेशल ही ट्रेन शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ११:२५ वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मिरजला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०८२ मिरज-उधना विशेष ही गाडी रविवार, ६ जुलै रोजी सकाळी ९:१० वाजता मिरजहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता उधना येथे पोहोचेल. ही गाडी बारडोली, व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील. ०९०७९ आणि ०९०८१ या ट्रेन क्रमांकांसाठी बुकिंग २३ जून पासून पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होणार असल्याचे पश्चिम रेल्वेने कळवले आहे.