Friday, October 24, 2025
Happy Diwali

वरंध घाट ३० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद

वरंध घाट ३० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

अलिबाग :राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५, डीडी राजेवाडी ते वरंध (रायगड जिल्हा हद्द)मधील रस्ता हा रस्ता अधिसूचनेच्या दि. ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीकरिता तसेच पावसाळ्यामध्ये आय.एम.डी.च्या अतिवृष्टीचा इशारा कालावधीत हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.

या कालावधीत रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांनी केलेल्या विनंतीनुसार तसेच पावसाळ्यामध्ये आय.एम.डी.च्या अतिवृष्टीचा इशारा कालावधीत सदर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे.

त्यानुसार नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-महाड-माणगाव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे असा मार्ग वापरावा, तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Comments
Add Comment