Saturday, August 23, 2025

येत्या रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही

येत्या रविवारी  पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही
मुंबई : येत्या रविवारी मध्यरात्री पश्चिम रेल्वेतर्फे बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे शनिवार व रविवार मध्यरात्री बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गांवर रात्री ११.१५ ते पहाटे २.४५ वाजेपर्यंत आणि डाऊन जलद मार्गांवर रात्री १२.४५ ते सकाळी ४.१५ वाजेपर्यंत ट्रॅक, सिग्नलिंग प्रणाली आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी जम्बो ब्लॉक घेईल. या ब्लॉक कालावधीत, विरार/वसई रोड ते बोरिवली दरम्यान जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. तसेच, ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल गाड्या रद्द राहतील. .त्यामुळे, रविवार, २२ जून रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही दिवस ब्लॉक असणार नाही.
Comments
Add Comment