ठाणे जिल्ह्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात

  46

जिल्हा कृषी विभागाकडून ८० क्विंटल बियाणांचा पुरवठा


ठाणे : पावसाने चांगलाच जोर धरला असल्याने शेतकरी सुखावला असून पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. ठाणे जिल्ह्याचे नागरीकरण अधिक झाले असले तरी जिल्ह्यात ५४ हजार २३१ हेक्टरवर शेतीची लागवड होणार असून त्यासाठी ३३९२ हेक्टरवर पेरणी होऊन रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्याकरिता जिल्हा अधीक्षक आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानावर ९२२ क्विंटल बियाणांचा पुरवठा शेतकर्यांना झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामशेर पांचे यांनी दिली.


ठाणे जिल्ह्यात भात व नाचणीची लागवड होते. जिल्ह्यात शेतीचे प्रमाण कमी होत असून नागरीकरणाकडे अधिक भर दिला जात आहे. मुरबाड, शहापूर, भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती व नाचणी होते. कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील काही भागात शेती केली जाते. ठाणे तालुक्यात काही भागात शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करताना दिसतात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ५४ हजार २३१ हे. जमिनीवर भात लागवड केली जाते. त्यासाठी ३,३९२ हेक्टरवर भाताचे रोप तयार करण्यासाठी पेरणी झाली आहे. या पेरणीसाठी शेतकर्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणांचा पुरवठा केला जातो. महाबीजकडून हे बियाणे पुरविले जाते. यावर्षी रत्नागिरी ८ या जातीच्या बियाणांसह रत्नागिरी ६ जातीची बियाणी पुरवण्यात आली. रत्नागिरी ६ जातीच्या बियाणातून बारीक तांदूळ मिळतो. त्याची मागणी शेतकर्यांकडून झाली आहे. त्यानुसार २४ क्विंटल बियाणी उपलब्ध करून दिली आहेत.


जिल्हा कृषी विभागाकडून ८० क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला असून ८ क्विंटल नाचणी बियाणे अनुदानावर गटांना देण्यात आले आहे. तर ठाणे जिल्हा परिषेदेकडून ८४२ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आलेला आहे.


बियाणांबरोबर ठाणे जिल्ह्यासाठी ४ हजार ५९३ मॅट्रिक टन खत उपलब्ध झाले असून त्यापैकी २ हजार ६२३ मॅट्रिक टनांची विक्री झाली आहे. सुमारे १,९७० खत शिल्लक आहे. सप्टेंबरपर्यंत खताची मागणी होत असल्याने जिल्ह्यात मुबलक खत उपलब्ध झाले असल्याचे कृषी अधिकारी पाचे यांनी सांगतिले.

Comments
Add Comment

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर

कल्याण शीळ फाट्यातील खड्ड्यांमुळे गेला तरुणाचा जीव

कल्याण : कल्याण शीळ रस्त्यातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात कल्याणातील एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. रोहन

कल्याणमध्ये कचराकुंडीजवळ नवजात अर्भक

कल्याण : कल्याण पश्चिमेतील बारावे गाव शिवमंदिर रस्त्यालगत नवजात स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळले आहे. मानवतेला