Sindhudurg Accident News: देवगडमध्ये एसटीचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू,

Sindhudurg Accident News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील नारिंग्रे गावात रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षा व्यावसायिकांचा समावेश आहे. तर मृत व्यक्तीमध्ये संकेत घाडी, संतोष गावकर, रोहन नाईक आणि सोनू कोळंबकर या चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर


दरम्यान, या अपघातात रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी गोवा येथील बांभुळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विजयदुर्ग-मालवण मार्गावर धावणारी एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली, ज्यामुळे रिक्षातील प्रवाशांचे प्राण गमवावे लागले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पूढील कारवाई सध्या केली जात आहे. मात्र या भीषण अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी मध्य धुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतलं. तसंच पुढील तपासणी सुरू केली आहे.
Comments
Add Comment

'Agricultural Mall' : राज्यातील टोल नाक्यांवर उभे राहणार 'कृषी मॉल', सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत

US Consulate in Peshawar : अमेरिका पाकिस्तानच्या पेशावरमधील वाणिज्य दूतावास बंद करणार

अमेरिकेने पाकिस्तानमध्ये एक महत्त्वपूर्ण कूटनीतिक पाऊल उचलले आहे. सुरक्षेच्या कारणांचा दाखला देत अमेरिकेने

नाशिक: काळाराम मंदिरात धर्मध्वज स्थापना; रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत धर्मध्वज उभारणार

नाशिक : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान,

ST NCMC Card : एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने

Share Market : जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत; आशियाई बाजारांमध्येही तेजीचा कल

जागतिक बाजार आज सकारात्मक संकेत दर्शवत आहेत. अमेरिकन बाजार मागील सत्रापेक्षा वाढीसह बंद झाले. डाऊ जोन्स

Supreme Court News : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि जलद करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे.