
लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या कसोटीत पंतने कर्णधार शुभमन गिलसोबत मोठी भागीदारी केली आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. पंतची खेळी केवळ तांत्रिकदृष्ट्या मजबूत नव्हती, तर इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध त्याच्या आत्मविश्वासाने आणि आक्रमक शैलीने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ आहे.
पंतची जबरदस्त कामगिरी
पंतने त्याच्या वादळी खेळीद्वारे आणखी अनेक विक्रम रचले आहेत. शतक पूर्ण करताना पंतने १० चौकार आणि चार षटकार मारले. इंग्लंडमधील पंतचे हे तिसरे कसोटी शतक होते. पंतने परदेशातील भूमीवर एकूण ५ कसोटी शतके आणि मायदेशात २ कसोटी शतके ठोकली आहेत. इंग्लंडच्या भूमीवर इंग्लंडविरुद्ध ३ शतके करणारा पंत हा एकमेव भारतीय यष्टीरक्षक आहे.
WHAT A KNOCK, WHAT A CELEBRATION! 💪💯
2018, 2021 & now 2025 - 𝙍𝙄𝙎𝙃𝘼𝘽𝙃-𝙋𝘼𝙉𝙏𝙄 continues on the English soil! 💪
👉 7th Test century
👉 4th vs ENG in Tests
👉 3rd in ENG in Tests#ENGvIND 1st Test, Day 2 | Streaming LIVE NOW on JioHotstar 👉 https://t.co/PLSZ49Mrj4… pic.twitter.com/MUySzy7Jr8
— Star Sports (@StarSportsIndia) June 21, 2025
इंग्लंडचा कसोटी संघ: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
भारतीय कसोटी संघ: केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंड-भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी: जून २०-२४, हेडिंग्ले (लीड्स)
दुसरी कसोटी: 2-6 जुलै, एजबॅस्टन (बर्मिंगहॅम)
तिसरी कसोटी: 10-14 जुलै, लॉर्ड्स (लंडन)
चौथी कसोटी: 23-27 जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर)
पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट, ओव्हल (लंडन)