11th International Yoga Day: "योग सर्वांचा आणि सर्वांसाठी, योगाने संपूर्ण जग जोडले आहे": पंतप्रधान नरेंद्र मोदी

विशाखापट्टणम: आज, २१ जून रोजी, देशात आणि जगात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. यावर्षी, 'योग संगम' या विशेष कार्यक्रमांतर्गत, देशभरात सकाळी ६:३० ते ७:४५ पर्यंत एक लाखाहून अधिक ठिकाणी सामान्य लोकांकडून एकत्रितपणे योग करण्यात आले. ज्यामध्ये जगभरातील लाखों योगप्रेमींचा देखील समावेश आहे. यादरम्यान विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले, "आज संपूर्ण जग योग करत आहे. योग म्हणजे जोडणे, आणि योगाने संपूर्ण जगाला जोडले आहे." 

सलाबादप्रमाणे यावर्षी देखील आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. केवळ भारतच नव्हे एकूण १९१ देशांतील लोकं आज योगा दिन साजरा करीत आहे. याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भव्य दिव्य राष्ट्रीय योग कार्यक्रम केला जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित विशाखापट्टणममध्ये


पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणममध्ये आहेत. येथील जनतेला संबोधित करताना ते म्हणाले, "गेल्या दशकातील योगाच्या प्रवासाकडे मी पाहतो तेव्हा मला अनेक गोष्टी आठवतात. ज्या दिवशी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जावा असा प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर सर्वात कमी वेळात जगातील १७५ देश आमच्या प्रस्तावाला पाठिंबा देत उभे राहिले." ते पुढे म्हणाले की, आजच्या जगात असा पाठिंबा देणे ही सामान्य घटना नाही. हा केवळ एका प्रस्तावाला पाठिंबा नव्हता, तर तो मानवतेच्या कल्याणासाठी जगाचा सामूहिक प्रयत्न होता. आज ११ वर्षांनंतर, आपण पाहत आहोत की योग जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. आपले दिव्यांग मित्र योगशास्त्रांचा अभ्यास करतात हे पाहून मला अभिमान वाटतो. शास्त्रज्ञ अंतराळात योग करतात."


मानवी जीवनासाठी योग हे विराम बटण


पंतप्रधान म्हणाले की योग  मानवी जीवनासाठी आवश्यक असलेळे विराम बटण आहे. श्वास घेण्यासाठी, संतुलन राखण्यासाठी आणि पुन्हा पूर्ण होण्यासाठी". "मानवतेच्या कल्याणासाठी हा दिवस साजरा करूया असे आवाहन करत त्यांनी योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

देशभरात योग दिन साजरा


महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रालयातदेखील योग दिन साजरा करण्यात आला. तर गेट वे ऑफ इंडियाच्या आवारात सकाळ सकाळी हजारोंच्या संख्येने मुंबईकरांनी योगा सत्रात सहभाग घेतला.  या व्यतिरिक्त पश्चिम बंगालमध्ये, झांजरा कॅम्पसमधील सिंदूर इको पार्कमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, जिथे मोठ्या संख्येने लोक योगाभ्यास करण्यासाठी जमले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील प्रल्हाद नगर गार्डन येथे झालेल्या योग सत्रात सहभाग घेतला दरम्यान मंत्री हर्ष संघवी, आमदार अमित ठाकर आणि अन्य भाजपा अधिकाऱ्यांनी देखील यात भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जगभरातील राजकीय मिशनमधील मान्यवरांसोबत योगासने केली.

गेल्या ११ वर्षांत आंतरराष्ट्रीय योग दिन हा एक जागतिक कार्यक्रम बनला आहे. योगाला जगाच्या जीवनशैलीशी जोडण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज, जगातील अनेक भागातील लोकांनी योगाला त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवले आहे.

 
Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर