आता शिवसेनाप्रमुखांना अनुभवताही येणार!

गंगापूर रोडवरील स्मृती उद्यानात साकारणार ‘थ्रीडी होलोग्राम’


नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचे आचरण आजही लाखोजनांकडून केले जाते. त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी गंगापूररोडवरील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात ‘थ्री डी होलोग्राम’ साकारले जात आहे. या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांना, त्यांच्या विचारांना अनुभवता येणार आहे. त्यांच्याशी गप्पागोष्टीही करता येतील. त्यांच्या थ्रीडी चित्रासोबत फोटोही काढता येणार आहेत. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटींचा निधी दिला आहे.


शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून गंगापूररोडवरील महापालिकेच्या जुन्या पंपिंग स्टेशनच्या जागेत स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व शस्त्र संग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे. तब्बल साडेसात एकर क्षेत्रात साकारलेल्या या प्रकल्पात विविध साहसी खेळांचा समावेश असलेले सर्वात मोठे अॅडव्हेंचर पार्क उभारण्यात आले आहे. कलावंतासाठी आर्ट गॅलरी, कलाकारांना हक्काचे व्यासपीठ असलेले ५०० आसन क्षमतेचे भव्य अॅम्पीथिएटर, ५०० लोक क्षमतेचे बहुउद्देशिय सभागृह, तसेच जगभरातील पुस्तकांचा समावेश असलेली ई-लायब्ररी उभारण्यात आली आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र तसेच सेमिनारसाठी अॅकॉस्टीक हॉलही उभारण्यात आला आहे.


प्रकल्प परिसरात आबालवृध्दांच्य मनोरंजनासाठी भव्य स्मृती उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. जुन्या पंपिंग स्टेशनमधील यंत्रसामग्रीचे जतन करताना या ठिकाणी रेस्टॉरंटही तयार करण्यात आले आहे. आता या स्मृती प्रकल्पात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे थ्री डी होलोग्राम साकारले जाणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून मुंबईत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकात अटलजींचा होलोग्राम तयार करण्यात आला आहे. त्या धर्तीवर नाशिकमध्ये शिवसेनाप्रमुखांचा होलोग्राम साकारण्यात येत आहे. या माध्यमातून पर्यटकांना शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट अनुभवता येणार आहे.

Comments
Add Comment

पाहुणे आले आणि दागिने चोरून पसार झाले

नाशिक : घरात मुक्कामासाठी आलेल्या पाहुण्यांनी रात्रीच्या सुमारास घरातील १८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून

अंत्ययात्रेची तयारी झाली पण खोकल्याने वाचला तरुणाचा जीव!

नाशिक : अपघातामध्ये जखमी झालेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तरुण मृत झाल्याचा माहितीवरून परिवाराने

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकुळ

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसात विविध ठिकाणी तीन बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले. जिल्ह्यात

कांदा खरेदी करूनही नाफेड' , एनसीसीएफने थकविले बळीराजाचे पैसे

नाशिक : राज्यामध्ये केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांनी शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी करून देखील

नदी परिसरात वापरलेल्या जिलेटिन कांड्या सापडल्याने खळबळ

नाशिक: नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरामध्ये असलेल्या नंदिनी नदीच्या परिसरात वापरलेल्या जिलेटिनच्या कांड्या

३९९ बिनातिकीट रेल्वे प्रवाशांवर कारवाई

भुसावळ विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम : २ लाख ३७ हजार ७१० दंड वसूल नाशिक : भुसावळ विभागातील भुसावळ, जळगाव, मनमाड,