
नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग जिंकली
पॅरिस: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra Wins Paris Diamond League) पुन्हा एकदा जागतिक क्रीडा मंचावर दमदार कामगिरी केली. शुक्रवारी रात्री (स्थानिक वेळेनुसार) पॅरिस डायमंड लीगमध्ये नीरजने पहिल्याच फेरीत ८८.१६ मीटरचा शानदार थ्रो टाकून विजेतेपद पटकावले.
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा जागतिक मंचावर आपले वर्चस्व सिद्ध केले. शुक्रवारी रात्री (स्थानिक वेळेनुसार) पॅरिस डायमंड लीगमध्ये नीरजने पहिल्याच फेरीत ८८.१६ मीटरचा शानदार थ्रो टाकून विजेतेपद पटकावले. मधल्या तीन फेऱ्यांमध्ये त्याचे थ्रो शून्य गुणांचे असले तरी, पहिल्या फेरीतील त्याचा थ्रो संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम ठरला, जो त्याला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसा होता.
पहिल्याच फेरीत अजिंक्य
पहिल्या फेरीत जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ८७.८८ मीटरचा सर्वोत्तम फेक मारून नीरजला कडवी झुंज दिली खरी, पण तो नीरजच्या थ्रोला हरवू शकला नाही. ब्राझीलच्या मॉरिसियो लुईझ दा सिल्वाने ८६.६२ मीटरचा फेक मारून तिसरे स्थान मिळवले. तर त्रिनिदादचा वेबर ८७.८८ मीटरसह आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट ८०.९४ मीटरसह मागे होते.
दुसऱ्या फेरीत वेबरने ८६.२० मीटरसह फेक मारला, तर नीरजचा फेक ८५.१० मीटर होता. वॉलकॉटनेही ८१.६६ मीटरसह थोडी सुधारणा केली. तिसऱ्या फेरीत मॉरिसियोने ८६.६२ मीटरचा फेक मारून आपली उपस्थिती दाखवली.
Ace javelin thrower Neeraj Chopra wins the Paris Diamond League with a throw of 88.16m in Round 1 of men's Javelin.
Germany's Julian Weber came second with a throw of 87.88m, and Brazil's Da Silva came third with a throw of 86.62m.
(file pic) pic.twitter.com/zZZ6rLUkZC
— ANI (@ANI) June 20, 2025
चौथ्या आणि पाचव्या फेरीत, वेबरने अनुक्रमे ८३.१३ मीटर आणि ८४.५० मीटर फेऱ्या मारून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ८८ मीटरचा टप्पा ओलांडू शकला नाही. अंतिम फेरीत, नीरजने ८२.८९ मीटरचा जोरदार फेरा टाकला, तर वेबर फक्त ८१.०८ मीटर आणि मॉरिसियोने ७८.५६ मीटर फेरा टाकला. यानुसार नीरजचा पहिला फेरीतला फेकच इतका जोरदार होता की तो संपूर्ण सामन्यात अजिंक्य राहिला.
क्लासिकमध्ये होणार सहभागी
नीरज चोप्रा आता क्लासिकची वाट पाहत आहे. दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता ठरलेल्या नीरजला ५ जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या क्लासिकचे आता वेध लागले आहेत. ही स्पर्धा मूळतः २४ मे रोजी होणार होती, परंतु भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तणावामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ही स्पर्धा आता ५ जुलै रोजी घेण्याचा निर्णय झाला.