Tushar Ghadigaonkar : शॉकिंग! मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या; मित्र म्हणाला, 'तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो'...

मुंबई : मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काम मिळत नसल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलले आहे. चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवेने त्याच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. तुषार घाडीगावकरच्या निधनामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.





अभिनेता अंकुर वाढवेने तुषार घाडीगांवकरच्या निधनासंदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. अंकुरने तुषारचा एक फोटो शेअर करून भावुक कॅप्शन दिलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की,''मित्रा का? कश्यासाठी? काम येतात जातात! आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत तुषार घाडीगावकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो.''



अभिनेता तुषार घाडीगावकरने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. त्याने हिंदीतही काम केले आहे. तसेच काही जाहिरातींमध्येही तो झळकला होता. त्याने उनाड , झोंबिवली, लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, भाऊबळी, हे मन बावरे, संगीत बिबट आख्यान या प्रोजेक्टमध्ये काम केले आहे.

Comments
Add Comment

हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला विरोध!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीचा कल

'बालिका वधू'ची आनंदी विवाहबंधनात! लग्नानंतर 'सिंदूर-मंगळसूत्र' लूकमध्ये पतीसोबत दिसली

टीव्ही अभिनेत्री अविका गोर आणि मिलिंद चंदवाणी अडकले विवाहबंधनात; राष्ट्रीय टीव्हीवर होणार प्रसारण मुंबई:

'फिर से गुड न्यूज' भारती आणि हर्षने खास पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी!

मुंबई : आपल्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि

“तुम्ही संत्री कशी खाता?” : FICCI Frames 2025 मध्ये अक्षय कुमारने फडणवीसांना विचारला गंमतीशीर प्रश्न !

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या मिश्कील शैलीसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना

‘प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई  : 'प्रेमाची गोष्ट २' या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला

आलिया भट सोबत कोण दिसणार मुख्य भूमिकेत ? विकी कौशल की रणबीर कपूर ?

लवकरच रणबीर कपूर आणि विकी कौशल एका जबरदस्त सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . येत्या ईद ला संजय लीला